LIVE : घाटकोपर इमारत दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 01 Jan 1970 05:30 AM
इमारत दुर्घटनेप्रकरणी आरोपी सुनील शितपला विक्रोळी कोर्टात हजर केलं
साईदर्शन इमारतीचे पिलर्स हटवून लोखंडी रॉड लावले, दुर्घटनेतील धक्कादायक माहिती समोर
घाटकोपर इमारत दुर्घटनेवरुन विधानसभेत स्थगन प्रस्ताव
घाटकोपर इमारत दुर्घटनेसंदर्भात विधानसभेत जोरदार गदारोळ, कामकाज बाजूला ठेवून चर्चा करण्याची विरोधकांची मागणी
घाटकोपरमधील बचावकार्यादरम्यान अग्निशमन दलाचे दोन कर्मचारी जखमी
घाटकोपरमधील साईदर्शन इमारत दुर्घटनेला 24 तास उलटले, अजूनही काही नागरिक ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता
घाटकोपरमधील इमारत दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू झाला. परंतु यामधील दिलासादायक बाब म्हणजे राजेश दोशी नावाच्या व्यक्तीला सुमारे 15 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर एनडीआरएफच्या जवानांनी सुखरुप बाहेर काढलं. राजेश दोशी यांना जवळच्याच शांतीनिकेतन रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

सुनील शितप पोलिसांच्या अटक :
घाटकोपर इमारत दुर्घटनेतील आरोपी शिवसेनेचा पदाधिकारी सुनील शितपला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साईदर्शन इमारतीच्या तळमजल्याशी छेडछाड करुन सुनील शितपनं नर्सिंग होमचं नुतनीकरण केलं होतं. या नुतनीकरणामुळेच इमारत कोसळल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. सुनील शितपची पत्नी स्वाती शितपने शिवसेनेकडून नगरसेवकपदाची निवडणूकही लढवली होती.

मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश :
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घाटकोपरमध्ये जाऊन घटनास्थळाची पाहणी केली. इमारत दुर्घटनेची चौकशी करुन 15 दिवसांत अहवाल सादर करा, असा आदेश मुख्यमंत्री आणि मुंबई महापालिकेचे आयुक्त अजॉय मेहता यांनी दिला आहे.

पार्श्वभूमी

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.