मुख्यपृष्ठMoviesसागरिका घाटगेविषयी 'या' सात गोष्टी तुम्हाला माहित आहेत?
सागरिका घाटगेविषयी 'या' सात गोष्टी तुम्हाला माहित आहेत?
Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 25 Apr 2017 06:55 PM (IST)
1/7
क्रिकेटपटू झहीर खान लवकरच ‘चक दे’ गर्ल सागरिका घाटगेशी विवाहबद्ध होणार आहे. सोमवारी झहीर खानने सागरिकासोबत साखरपुडा झाल्याचा फोटो ट्विटरवर पोस्ट केला.
2/7
अभिनयासोबतच सागरिका नॅशनल लेव्हलची ख्यातनाम अॅथलिटही आहे.
3/7
सागरिका खतरोंके खिलाडीच्या सहाव्या पर्वात सहभागी झाली होती. यात तिने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली.
4/7
चक दे नंतर सागरिकाने फॉक्स, मिले ना मिले हम, रश, जी भर के जीले, इरादा अश्या बऱ्याच हिंदी सिनेमांमध्ये काम केलं.
5/7
दिलदरिया हा सागरिकाचा पहिला पंजाबी सिनेमा. या सिनेमासाठी सागरिकाने पंजाबी भाषेचेही धडे गिरवले
6/7
हिंदी आणि पंजाबी भाषिक सिनेमांसोबतच सागरिकाने मराठीमध्येही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांवर छाप सोडली आहे. 2013 मध्ये सतीश राजवाडे दिग्दर्शित ‘प्रेमाची गोष्ट’मध्ये सागरिका झळकली होती.
7/7
2007 मध्ये आलेल्या ‘चक दे इंडिया’ या सिनेमातून सागरिका लाईमलाईटमध्ये आली. या सिनेमात सागरिकाने साकारलेली प्रीती सबरवाल ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात राहिली.