मुंबई : दिग्दर्शक जीतू जोझेफचा 'दृश्यम 2' हा चित्रपट जबरदस्त चर्चेत आला आहे. हा चित्रपट नुकताच अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित झाला आणि रिलीज झाल्यानंतर काही तासातच लिकही झाला. तमिळरॉकर्स या सोशल साईटवर हा लिक झाला आहे. पायरसी साइट तामिळरोकर्ससोबत इतर अनेक अॅप्सवरही हा प्रसारित केला जात आहे.
पायरसीवर कडक बंदी असूनही तामिळरॉकर्स तसेच इतर पायरसी साइट्स अद्यापही सक्रीय आहेत. चित्रपट प्रदर्शित होताच अगदी काही तासांमध्ये मोठे चित्रपट यावर लिक केले जातात. केवळ बॉलिवूडच नाही तर हॉलीवूडचे सर्व चित्रपट या माध्यमांवर लिक झाले आहेत. यामुळे निर्मात्यांना बरंच नुकसान सहन करावं लागत आहे. साऊथ इंडियन सिनेमातील बहुप्रतिक्षित चित्रपट 'दृश्यम 2' ची लिक होण्यात तामिळरॉकर्ससोबत तामिळगुणसारख्या पायरसी वेबसाइटचाही हात असल्याचं समोर आलंय.
पिंपरीतील सावकाराची बापलेकाकडून दृश्यम स्टाईल हत्या
पुण्यात 'दृश्यम' पाहून सख्ख्या चुलत भावाची हत्या!
'दृश्यम' फेम श्रिया सरनची अवॉर्ड सोहळ्याला हजेरी
मुलीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी युवकाची 'दृश्यम'स्टाईल हत्या