Chor Nikal Ke Bhaga Review : बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम (Yami Gautam) आणि सनी कौशलचे (Sunny Kaushal) सिनेमे बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात कमी पडत असले तरी ओटीटी प्लॅटफॉर्मवर मात्र धुमाकूळ घालत आहेत. यामीचे सिनेमे ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला चाहते पसंती दर्शवत आहेत. यामी गौतम आणि सनी कौशलचा 'चोर निकल के भागा' (Chor Nikal Ke Bhaga) हा सिनेमा नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. 


'चोर निकल के भागा' या सिनेमाचं कथानक काय? (Chor Nikal Ke Bhaga Story)


'चोर निकल के भागा' हा सिनेमा अंकित सेठीच्या (सनी कौशल) भोवती फिरतो. कोट्यवधी किंमतीचे हिरे चोरण्यासाठी नेहा ग्रोवरची (यामी गौतम) अंकित मदत घेतो. हवाईसुंदरी असणाऱ्या नेहाला तो त्याच्या स्वर्थासाठी प्रेमाच्या जाळ्यात अडकवतो. तो नेहाला फक्त प्रेमाच्या जाळ्यात अडकवत नाही तर ती प्रेग्नंट राहिल्यानंतर तो तिला लग्नाची स्वप्नदेखील दाखवतो. 


अंकित हा एक उद्योजक असून त्याच्या डोक्यावर प्रचंड कर्ज आहे. हे कर्ज फेडण्यासाठी तो यामीला फसवतो. नेहाला अंकितची खरी ओळख माहित नसल्याने तीदेखील कोट्यवधी किंमतीचे हिरे चोरण्यासाठी अंकितची मदत करते. पण सिनेमात एक ट्वीस्ट येतो आणि अंकितचा खरा चेहरा यामीसमोर येतो. त्यानंतर यामी अंकितचा सूड घेण्याचं ठरवते. सूड घेणाऱ्या महिलेवर आधारित या सिनेमाचं कथानक आहे. नेहाने सूड घेण्याचं ठरवल्यानंतर अंकितच्या अडचणीत वाढ होणार का? खरा चेहरा समोर आल्यानंतरही नेहा त्याची मदत घेणार का? हे जाणून घेण्यासाठी हा सिनेमा नक्की पाहा. हिऱ्यांची चोरी आणि विमानाचं हायजॅक यावर भाष्य करणारं 'चोर निकल के भागा' या सिनेमाचं कथानक आहे. 


अजय मेहताने 'चोर निकल के भागा' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या सिनेमाचं कथानक प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारं आहे. सुरुवातीला हा रोमॅंटिक सिनेमा वाटत असला तरी हळुहळु या सिनेमाची गोष्ट प्रेक्षकांसमोर येऊ लागते. हे क्लायमॅक्स प्रेक्षकांना सिनेमात गुंतवून ठेवतात. 


'चोर निकल के भागा' या सिनेमातील यामी गौतमच्या अभिनयाचं कौतुक. तिने आपली नेहाची भूमिका चोख निभावली आहे. पहिल्या भागात साधीभोळी वाटणाऱ्या यामीचा एक वेगळा अवतार लगेचच दुसऱ्या भागात प्रेक्षकांना अनुभवायला मिळत आहे. सनी कौशलनेदेखील उल्लेखनीय काम केलं आहे. एकंदरीत या सिनेमातील सर्वच कलाकारांनी चांगलं काम केलं आहे. शरद केळकरनेदेखील या सिनेमात महत्त्वाची भूमिका निभावली आहे. 


'चोर निकल के भागा' या सिनेमात प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळत आहे. तुम्हाला थरार-नाट्य असलेले सिनेमे आवडत असतील तर 'चोर निकल के भागा' हा सिनेमा तुम्हाला नक्कीच आवडेल. सिनेमाच्या कथेवर भर दिला असला तरी संवादाकडे मात्र दुर्लक्ष करण्यात आलं आहे. ही गोष्ट सिनेमा पाहताना जाणवते. या सिनेमाचं कथानक रटाळवाणं नसलं तरी सिनेमा वन टाइम वॉच आहे.