Kangana Ranaut Targeted Karan Johar : बॉलिवूड सिने-निर्माता करण जोहर (Karan Johar) सध्या चर्चेत आहे. नुकताच त्याचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओनंतर नेटकऱ्यांनी त्याला चांगलच ट्रोल केलं. या व्हिडीओमध्ये तो अनुष्का शर्माचं (Anushka Sharma) करिअर धोक्यात आणण्याबाबत भाष्य करताना दिसत आहे. आता करण जौहरच्या या वक्तव्यावर 'पंगाक्वीन'ने निशाणा साधला आहे. 


जुना व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर करण जोहरने सोशल मीडियावर एक शायरी पोस्ट केली होती. त्याने लिहिलं होतं,"हम झुकने वालों से नहीं, झूठ के बन जाओ गुलाम, हम बोलने वालों में से नहीं, जितना नीचा दिखाओगे, जितने आरोप लगाओगे, हम गिरने वालों में से नहीं, हमारा कर्म हमारी विजय है, आप उठा लो तलवार, हम मरने वालों में से नहीं". करणने ही शायरी शेअर करत टीकाकारांना सडेतोड उत्तर दिलं होतं. 


कंगना रनौत काय म्हणाली? (Kangana Ranaut Post)


करणच्या या शायरीवर कंगनाने आता तिची प्रतिक्रिया दिली आहे. तिने करणची स्टोरी शेअर करत त्याला टोमणा मारला आहे, तिने लिहिलं आहे,"असाही एक काळ होता जेव्हा चाचा चौधरी आणि उच्चभ्रू नेपो माफिया नॅशनल टेलिव्हिजनवर माझा अपमान करत असे. कारण त्यावेळी मला चांगलं इंग्रजी बोलता येत नव्हतं...पण आज माझ्यामुळे तुझं हिंदी सुधारलं आहे, आता पुढे बघा काय काय होतं ते".



'पंगाक्वीन' कंगना रनौत सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे ती कायमच चर्चेत असते. बॉलिवूड, मनोरंजनसृष्टी, राजकारण, समाजकारण अशा विविध गोष्टींवर ती व्यक्त होत असते. तिची मतं काही नेटकऱ्यांना खटकतात आणि ते तिला ट्रोल करायला सुरुवात करतात. बॉलिवूड सेलिब्रिटींवरदेखील कंगना निशाणा साधत असते. 


कंगनाचे आगामी सिनेमे (Kangana Ranaut Upcoming Movies)


कंगनाचा बहुचर्चित 'इमरजेन्सी' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात ती इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच या सिनेमाची कथा, दिग्दर्शन आणि निर्मितीदेखील तिनेच केली आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये या सिनेमाची चांगलीच उत्सुकता आहे. तसेच तिच्या 'लॉक अप'या कार्यक्रमाचं नवं पर्वदेखील लवकरच सुरू होणार आहे. 


संबंधित बातम्या


Entertainment News Live Updates 10 April : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!