Yaariyan 2 Review: काही चित्रपट असे असतात ज्यांच्याकडून तुम्हाला अजिबात अपेक्षा नसते की, ते चित्रपट चांगले असतील. यारियां 2 (Yaariyan 2) हा चित्रपट अशाच चित्रपटांपैकी आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आणि या चित्रपटाच्या प्रमोशनची शैली या सगळ्या गोष्टींपेक्षा चित्रपट हा पूर्णपणे वेगळ्या होता. हा चित्रपट एका सरप्राइजसारखा आहे आणि हे सरप्राइज खूपच सुंदर आहे.
चित्रपटाची कथा
चित्रपटाची कथा आहे तीन चुलत भावंडांची. लाडली म्हणजेच दिव्या खोसला कुमार, शिखर म्हणजेच मीझान जाफरी आणि बजरंग म्हणजेच पर्ल व्ही पुरी यांची गोष्ट चित्रपटात दाखवण्यात आली आहे. त्यांच्या वैयक्तिक आणि करिअरमध्ये जे काही घडते, ते या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. लाडली तिच्या वैवाहिक जीवनाने त्रस्त आहे. बजरंगचे दु:ख म्हणजे त्याची प्रेमात फसवणूक झाली आहे. शिखरची आवड बाइक रेसिंगची आहे पण त्याच्या देखील आयुष्यातही गोंधळ आहे.यामधील सर्वात मनोरंजक लाडलीची कथा आहे. लाडलीच्या आयुष्यात काय घडते? हे पाहण्यासाठी तुम्हाला थिएटरमध्ये जावे लागेल.
चित्रपट कसा आहे ?
हा फ्रेश चित्रपट आहे. चित्रपटाचा पहिला हाफ जरा कंटाळवाणा वाटतो पण दुसरा हाफ हा चित्रपटाचा आत्मा आहे. चित्रपटाला मुद्द्यावर यायला बराच वेळ लागतो.
कलकारांचा अभिनय
दिव्या खोसला कुमार ही चित्रपटाची नायिका आहे. संपूर्ण चित्रपट तिच्याभोवती फिरतो. या चित्रपटात दिव्या तुम्हाला आश्चर्यचकित करते. तिनं खूप चांगली अभिनय केला आहे. मीझान जाफरी हा या चित्रपटाच्या माध्यमातून हे दाखवतो की, तो फक्त जावेद जाफरीचा मुलगा असल्यामुळे इंडस्ट्रीत नाहीये. त्याच्याकडे ताकद आहे आणि तो चांगले काम करू शकतो. या चित्रपटात देखील मीझानने उत्तम काम केले आहे. पर्ल व्ही पुरीने देखील चांगले काम केलं आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शन
चित्रपटाचे दिग्दर्शन राधिका राव आणि विनय सप्रू यांनी केले आहे, ज्यांनी टी-सिरीजसाठी अनेक म्युझिक व्हिडिओ बनवले आहेत. चित्रपटाला एक नवीन आणि फ्रेश फील देण्यात ते यशस्वी ठरले आहेत.
यारियां 2 या चित्रपटाची पटकथा अजून चांगली होऊ शकली असती. सुरुवातीला तीन चुलत भावांची गोष्ट सांगण्यात बराच वेळ गेला आणि त्यामुळे पूर्वार्ध कंटाळवाणा झाला.
चित्रपटाचे संगीत
जर चित्रपट टी सीरीजचा असेल, तर साहजिकच गाण्यांवर खूप मेहनत घेतली जाते. चित्रपटातील संगीत तरुणाईचे आहे, ऐकायला मजा येते. एकंदरीत हा एक फ्रेश चित्रपट आहे जो बघायला मजा येते.