Leo Box Office Collection Day 3: अभिनेता थलापती विजयचा (Vijay Thalapathy) लियो (Leo) चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट 19 ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला होता. आता चार दिवसांत या चित्रपटाने रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे. लियो चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अवघ्या दोन दिवसांत 100 कोटींचा टप्पा पार केला होता. तर आता चार दिवसांच्या कलेक्शनसह हा चित्रपट 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल, असा अंदाज लावला जात आहे.
Sacnilk च्या रिपोर्टनुसार, लियो चित्रपटाने रिलीजनंतर पहिल्या दिवशी 64.8 रुपयांची कमाई केली. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 35.25 कोटींची कमाई केली होती तर तिसऱ्या दिवशी 40 कोटींची कमाई केली आहे. यासह, चित्रपटाचे एकूण कलेक्शन आता 140.05 कोटी रुपये झाले आहे.
लियो चित्रपटानं रिलीज होताच बॉक्स ऑफिसवर कब्जा केला आहे. लियो चित्रपटाच्या रिलीजच्या दुसऱ्याच दिवशी टायगर श्रॉफचा मोस्ट अवेटेड 'गणपत' आणि दिव्या खोसला कुमारचा 'यारियाँ 2' हे चित्रपट रिलीज झाले, पण लिओ चित्रपट हा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. 'गणपत' चित्रपटानं दुसऱ्या दिवशी 2.25 कोटी रुपये कमावले, तर यारियां 2 चित्रपटानं 0.55 कोटी रुपये कमाई केली आहे.
विजय थलापतीचा लियो चित्रपट हा एक अॅक्शन ड्रामा चित्रपट आहे. सेन्सॉर बोर्डानं 'लियो' या चित्रपटाला U/A प्रमाणपत्र दिले आहे. ज्याचे दिग्दर्शन लोकेश कनागराज यांनी केले आहे. प्रेक्षक बऱ्याच दिवसांपासून या चित्रपटाची वाट पाहत होते. लोकेश कानगराज यांनी 'लियो' या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. थलपथी विजय आणि संजय दत्त (Sanjay Dutt) व्यतिरिक्त या चित्रपटात त्रिशा कृष्णन, प्रिया आनंद, गौतम वासुदेव मेनन आणि मन्सूर अली खान यांच्यासह अनेक कलाकार आहेत.
थलापती विजयचे चित्रपट
लव्ह टुडे,पूवे उनाक्कागा , प्रियामुदन,थुल्लाधा मनामुम थुल्लुम, कधालुक्कू मरियाधाई ,थुप्पक्की,कठ्ठी या थलपथी विजयच्या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. आता थलापती विजयचा लियो चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: