एक्स्प्लोर

Yaariyan 2 Review: कसा आहे 'यारियां 2' चित्रपट? वाचा रिव्ह्यू

Yaariyan 2 Review: हा चित्रपट एका सरप्राइजसारखा  आहे आणि हे सरप्राइज खूपच सुंदर आहे.

Yaariyan 2 Review: काही चित्रपट असे असतात ज्यांच्याकडून तुम्हाला अजिबात अपेक्षा नसते की, ते चित्रपट चांगले असतील. यारियां 2 (Yaariyan 2) हा  चित्रपट अशाच चित्रपटांपैकी आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आणि या चित्रपटाच्या प्रमोशनची शैली या सगळ्या गोष्टींपेक्षा चित्रपट हा पूर्णपणे वेगळ्या होता. हा चित्रपट एका सरप्राइजसारखा  आहे आणि हे सरप्राइज खूपच सुंदर आहे.

चित्रपटाची कथा

चित्रपटाची कथा आहे तीन चुलत भावंडांची. लाडली म्हणजेच दिव्या खोसला कुमार, शिखर म्हणजेच मीझान जाफरी आणि बजरंग म्हणजेच पर्ल व्ही पुरी यांची गोष्ट चित्रपटात दाखवण्यात आली आहे. त्यांच्या वैयक्तिक आणि करिअरमध्ये जे काही घडते, ते या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. लाडली तिच्या वैवाहिक जीवनाने त्रस्त आहे. बजरंगचे दु:ख म्हणजे त्याची प्रेमात फसवणूक झाली आहे. शिखरची आवड बाइक रेसिंगची आहे पण त्याच्या देखील आयुष्यातही गोंधळ आहे.यामधील सर्वात मनोरंजक लाडलीची कथा आहे. लाडलीच्या आयुष्यात काय घडते? हे पाहण्यासाठी तुम्हाला थिएटरमध्ये जावे लागेल.

चित्रपट कसा आहे ?

हा फ्रेश चित्रपट आहे. चित्रपटाचा पहिला हाफ जरा कंटाळवाणा वाटतो पण दुसरा हाफ हा चित्रपटाचा आत्मा आहे.  चित्रपटाला मुद्द्यावर यायला बराच वेळ लागतो.

कलकारांचा अभिनय

दिव्या खोसला कुमार ही चित्रपटाची नायिका  आहे. संपूर्ण चित्रपट तिच्याभोवती फिरतो. या चित्रपटात दिव्या तुम्हाला आश्चर्यचकित करते. तिनं खूप चांगली अभिनय केला आहे. मीझान जाफरी हा या चित्रपटाच्या माध्यमातून हे  दाखवतो की, तो फक्त जावेद जाफरीचा मुलगा असल्यामुळे इंडस्ट्रीत नाहीये.  त्याच्याकडे ताकद आहे आणि तो चांगले काम करू शकतो. या चित्रपटात देखील मीझानने उत्तम काम केले आहे. पर्ल व्ही पुरीने देखील  चांगले काम केलं आहे.  

चित्रपटाचे दिग्दर्शन 

चित्रपटाचे दिग्दर्शन राधिका राव आणि विनय सप्रू यांनी केले आहे, ज्यांनी टी-सिरीजसाठी अनेक म्युझिक व्हिडिओ बनवले आहेत. चित्रपटाला एक नवीन आणि फ्रेश फील देण्यात ते यशस्वी ठरले आहेत.  

यारियां 2 या चित्रपटाची पटकथा अजून चांगली होऊ शकली असती. सुरुवातीला तीन चुलत भावांची गोष्ट सांगण्यात बराच वेळ गेला आणि त्यामुळे पूर्वार्ध कंटाळवाणा झाला.  

चित्रपटाचे संगीत 

जर चित्रपट टी सीरीजचा असेल, तर साहजिकच गाण्यांवर खूप मेहनत घेतली जाते. चित्रपटातील संगीत तरुणाईचे आहे, ऐकायला मजा येते. एकंदरीत हा एक फ्रेश चित्रपट आहे जो बघायला मजा येते.

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Who is Bollywood No. 1 Actor :  शाहरुख, आमीर की आणखी कोण? बॉलिवूडचा नंबर वनचा अभिनेता कोण? कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्राने नावच उघड केलं
शाहरुख, आमीर की आणखी कोण? बॉलिवूडचा नंबर वनचा अभिनेता कोण? कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्राने नावच उघड केलं
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Panchavati Express Canceled : मनमाडहून मुंबईला येणारी पंचवटी एक्सप्रेस रद्दMumbai Monsoon Rain : सायन, कुर्ला, विक्रोळी, भांडूप स्टेशनवर रुळांवर पाणीABP Majha Marathi News Headlines 6.30 AM TOP Headlines 6.30AM 08 July 2024Mumbai Rain : मुंबईत रात्रीपासून मुसळधार पाऊस, जागोजागी साचलं पाणी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Who is Bollywood No. 1 Actor :  शाहरुख, आमीर की आणखी कोण? बॉलिवूडचा नंबर वनचा अभिनेता कोण? कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्राने नावच उघड केलं
शाहरुख, आमीर की आणखी कोण? बॉलिवूडचा नंबर वनचा अभिनेता कोण? कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्राने नावच उघड केलं
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
Embed widget