Vijay 69 Review: अनुपम खेर (Anupam Kher) यांनी 28 व्या वर्षी सरांश चित्रपटात वृद्ध व्यक्तीची भूमिका केली होती आणि ते स्टार बनले होते, आता वयाच्या 69 व्या वर्षी त्यांनी विजय मॅथ्यू या 69 वर्षाच्या वृद्धाची भूमिका साकारली आहे. हा अभिनेता ना ऑन स्क्रिन आणि ना खऱ्या आयुष्यात म्हातारा होण्यास तयारच नाही, असं चित्र आहे. त्यामुळे खबरदार जर या अभिनेत्याला कोणी लाइफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड देण्याचे धाडस केले तर, कारण या माणसामध्ये अजूनही बराच सिनेमा शिल्लक आहे आणि तो आपल्याला आणखी दर्जेदार सिनेमे देखील देणार आहे. त्याचप्रमाणे अभिनयाचही असं दर्जेदार कौशल्य सादर करणार आहे की, ज्याला रिव्ह्यु करताना काय लिहिलं जाईल हेच समजत नाहीये. गेल्या वेळी मी लिहिले होते की अनुपम खेर यांच्या काळात आपण जगतोय म्हणून आपण खरंच भाग्यवान आहोत, यावेळी ते पुन्हा एकदा जाणवलं आहे.
गोष्ट
ही गोष्ट आहे एका 69 वर्षाच्या माणसाची आहे, ज्याच्याकडे त्याने आयुष्यात काय केलं हे सांगायला उत्तरच नाही. अशा वेळी तो ठरवतो की, आता ट्रायथलॉन करायचं. ज्यामध्ये 1.5 किलोमीटर पोहणे, 40 किलोमीटर सायकलिंग आणि 10 किलोमीटर धावणे समाविष्ट असतं. पण ज्याचा एक पाय ठीक नाही अशी व्यक्ती हे कसं करु शकेल? आणि तो ते करू शकेल का असा प्रश्न लोकांना पडतो. नेटफ्लिक्सचा हा सगळ्यात चांगला सिनेमा आहे.
कसा आहे सिनेमा?
हा या वर्षातील सर्वात प्रेरणादायी चित्रपटांपैकी एक आहे. हा चित्रपट तुम्हाला खूप प्रेरणा देतो, हा चित्रपट पाहिल्यानंतर तुम्ही तुमच्या पालकांना मिठी माराल, त्यांच्याबद्दल विचार कराल, त्यांच्या स्वप्नांचा विचार कराल, हा चित्रपट तुम्हाला खूप भावूक करतो. तुमच्या डोळ्यांतून अश्रू येतात, चित्रपटात ज्या प्रकारे भावना दाखवल्या आहेत ते तुम्हाला खरोखर रडवतात, हा चित्रपट तुम्हाला उठून तुमच्या स्वप्नांसाठी काहीतरी करण्याची प्रेरणा देईल, जे तुम्ही पुढे ढकलत आहात या प्रकारचे चित्रपट केवळ आपले मनोरंजन करत नाहीत, तर ते आपल्याला खूप काही देतात आणि या गोष्टी आपल्याला कुठेही सापडत नाहीत, खूप शोधूनही हा चित्रपट पाहण्याची हजारो कारणे आहेत
अभिनय
अनुपम खेर यांनी ज्या पद्धतीने हे पात्र साकारले आहे, ते फक्त तेच करू शकले असते. वयाच्या 69 व्या वर्षी त्याने दाखवलेली जिद्द, जोश, ऊर्जा वाखडण्याजोगी आहे. या सिनेमाच्या शुटींगवेळी अनुपम खेर यांच्या खांद्याला दुखापत झाली होती, तरीही त्यांनी शुटींग सुरुच ठेवलं. पाएंगा, या चित्रपटात तुम्ही अनुपम खेरसोबत हसता, त्यांच्यासोबत रडता, त्यांच्या पराभवावर तुम्हाला पराभूत झाल्यासारखे वाटते आणि त्याच्या विजयावर तुम्ही काहीतरी जिंकल्यासारखे वाटतात, हा एका अप्रतिम अभिनेत्याचा गुण आहे. चंकी पांडेनेही अप्रतिम काम केले आहे. त्याच्या व्यक्तिरेखेकडे पाहून तुम्हाला असे वाटते की आपणही 69 वर्षांचे असताना असा मित्र असावा.अनुपम खेरसारख्या अभिनेत्यासोबत मिहिर आहुजाचे काम चांगले आहे
दिग्दर्शन
अक्षय रॉयने अब्बास टायरवालासोबत चित्रपटाचे लेखन केले असून अक्षयने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. अक्षयच्या दिग्दर्शनाला पूर्ण मार्क्स मिळावेत, त्याने केवळ आई-वडिलांच्या स्वप्नांवर चित्रपट बनवला नाही तर आजच्या पिढीशीही त्याने भावना विणल्या आहेत. एकूण काय हा सिनेमा कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही पाहा.
रेटिंग - 4 स्टार