Sai Tamhankar : मराठी सिनेसृष्टीतील आघाडींच्या अभिनेत्रींपैकी सई ताम्हणकर (Sai Tamhankar) एक आहे. सईने आतापर्यंत अनेक गाजलेल्या सिनेमामधून प्रेक्षकांच्या स्मरणात राहणाऱ्या भूमिका केल्या आहेत. इतकच नव्हे तर तिने बॉलिवूड आणि ओटीटीवरही आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. त्यामुळे सई ताम्हणकर हे सध्या बॉलिवूडमध्येही आघाडीचं नाव झालं आहे. पण याच सई ताम्हणकरला ती चकणी आहे म्हणून तिच्या पहिल्याच सिनेमातून काढून टाकण्यात आलं होतं.
सईने नुकतीच मिस मालिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये सईने हा खुलासा केला आहे. सईच्या सुरुवातीच्या काळातील हा सिनेमा होता. मालिका, छोटा पडदा आणि सिनेमे अशा तिन्ही माध्यमांवर सईने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. तसेच सई नुकतीच मानवत मर्डस या सीरिजवरुन प्रेक्षकांच्या भेटीस आली होती.
'मी चकणी आहे म्हणून सिनेमातून काढलं..'
तुला कधी रिजेक्शन्स मिळाले आहेत का? असा प्रश्न यावेळी सईला विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना सईने म्हटलं की, माझ्या सुरुवातीच्या काळात माझं एका मराठी सिनेमासाठी कास्टिंग झालं होतं. पण शुटींगच्या दोन दिवस आधीच मला रिप्लेस करण्यात आलं. ती गोष्ट माझ्यासाठी खूप धक्कादायक होती. त्यानंतर मला बराच वेळ कामासाठी वाट पाहावी लागली. पण त्याच गोष्टी आज मी जे काही त्यासाठी मला तयार केलं.
पुढे सईने तिच्या काढून टाकण्याचं कारण सांगत म्हणालं की, मी चकणी आहे, असं सांगून मला त्या सिनेमातून काढून टाकण्यात आलं. त्यावेळी मला खूप राग आला होता. त्यानंतर बरेच महिने माझ्यासाठी अजिबात चांगले गेले नाहीत.
सईचा सिनेप्रवास...
सईने मालिकांमधून तिच्या अभिनयाच्या कारकिर्दिला सुरुवात केली होती. तिने तुझ्याविना, या गोजिरवाण्या घरात, कस्तुरी या मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. त्यानंतर तिने आमिर खानच्या गजनी या सिनेमातून मोठ्या पडद्यावर आणि बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. त्याने सनई चौघडे, क्लासमेट्स, दुनियादारी, नो एन्ट्री, प्यारवाली लव्हस्टोरी, तु ही रे अशा सिनेमांमधून सई प्रेक्षकांच्या भेटीला आली. त्यानंतर तिने हंटर, भक्षक, मिमी यांसारख्या बॉलीवूड सिनेमांमध्येही काम केलं. तसेच आता सईने तिच्या नव्या व्यावसायाची देखील सुरुवात केली आहे.