Nawazuddin Siddiqui Tiku Weds Sheru Review : गेल्या काही दिवसांत ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक चांगले सिनेमे (Movies) आणि वेबसीरिज (Web Series) प्रदर्शित होत आहेत. अशातच बॉलिवूडची 'पंगाक्वीन' कंगना रनौतची (Kangana Ranaut) निर्मिती असलेला 'टिकू वेड्स शेरू' (Tiku Weds Sheru) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) आणि अवनीत कौर (Avneet Kaur) मुख्य भूमिकेत आहेत.


'टिकू वेड्स शेरू' सिनेमाचं कथानक काय आहे? (Tiku Weds Sheru Story)


'टिकू वेड्स शेरू' हा सिनेमा मुंबईत राहणाऱ्या ज्युनियर आर्टिस्ट शेरू आणि भोपाळमध्ये राहणाऱ्या टिकूची गोष्ट सांगणारा आहे. शेरूला सिनेसृष्टीत यश न मिळत असल्याने तो वाईट धंद्याचा अवलंब करतो. तसेच सिनेनिर्मिती करण्याच्या उद्देशाने तो कर्ज काढतो. पण त्याचे नुकसानच अधिक होते. 


शेरुचं लग्नाचं वय झाल्याने त्याच्याकडे टिकूचं स्थळ येतं. या लग्नामुळे त्याला 10 लाख रुपये मिळणार असतात.  टीकू आणि शेरू दोघेही या लग्नासाठी तयार होता. मुंबईत येऊन अभिनेत्री होण्याचं स्वप्न टिकू पाहते. लग्नानंतर ते मुंबईत येतात आणि शेरूच्या लक्षात येतं की, टीकूचा बॉयफ्रेंड असून त्याने तिला फसवलं आहे आणि आता ती प्रेग्नंट आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना सिनेमा पाहावा लागेल. 


नवाजच्या अभिनयाचं प्रेक्षकांकडून कौतुक


नवाजने शेरूची भूमिका खूपच चांगली साकारली आहे. ज्युनियर आर्टिस्ट म्हणून त्याने प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं आहे. त्यामुळे त्याच्या दर्जेदार अभिनयाचं प्रेक्षकांकडून कौतुक होत आहे. अवनीत कौरने आपली भूमिका चोख बजावली आहे. तसेच झाकिर हुसैन, मुकेश एस भट्ट आणि विपिन शर्मानेदेखील चांगलं काम केलं आहे. 


'टिकू वेड्स शेरू' कसा आहे? 


'टिकू वेड्स शेरू' हा वन टाइम वॉच सिनेमा आहे. या सिनेमाकडून प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा होत्या. पण प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात हा सिनेमा कमी पडला आहे. सिनेमा कुठेतरी रटाळ होतो. पण नवाज मात्र सिनेमा पुन्हा वर उचलतो.


'टिकू वेड्स शेरू' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा साई कबीरने सांभाळली आहे. तर साई कबीर आणि अमित तिवारीने या सिनेमाचं लेखन केलं आहे. लेखन आणि दिग्दर्शनाच्या बाबतीत हा सिनेमा कमी पडला आहे. एकंदरीत हा सिनेमा प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा आहे. 


संबंधित बातम्या


Tiku Weds Sheru trailer:27 वर्षांनी लहान असणाऱ्या अभिनेत्रीसोबत नवाजुद्दीननं केला किसिंग सीन; ट्रेलर पाहून भडकले नेटकरी