Kerala Crime Files  Web Series Teaser Out : 'केरळ क्राईम फाईल्स' (Kerala Crime Files) या बहुचर्चित वेबसीरिजचा टीझर आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ही डिज्नी प्लस हॉटस्टारची पहिलीच मल्याळम सीरिज आहे. या सीरिजमध्ये लाल आणि अजू वर्गीस मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ही सीरिज मल्याळम, तामिळ, तेलुगू, हिंदी, कन्नड, बंगाली आणि मराठीभाषेमध्ये प्रदर्शित होणार आहे. 


'केरळ काईम फाईल्स' ही सीरिज सत्य घटनेवर आधारित नाही. या सीरिजमध्ये प्रेक्षकांना खूप ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. सीरिजचा धमाकेदार टीझर पाहूण प्रेक्षकांची सीरिजबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. मल्याळम सिनेमांप्रमाणे या सीरिजमध्येही प्रेक्षकांना रहस्य, थरार आणि नाट्य पाहायला मिळणार आहे. येत्या 23 जूनला ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


'केरळ क्राईम फाईल्स'च्या टीझरच्या सुरुवातीला एक खुन होताना दाखवण्यात आला आहे. त्यानंतर तपासात पुढे जात असताना हे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे होत जाते. या सीरिजमधील गूढ रहस्य प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करतात. टीझर रिलीज झाल्याने प्रेक्षकांची सीरिजबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. 


'केरळ क्राईम फाईल्स' ही सीरिज उपनिरीक्षक मनोज यांच्या नेतृत्वाखालील सहा पोलिसांच्या पथकाभोवती फिरते. हे पोलिस एका लॉजमध्ये घडलेल्या एका खून प्रकरणाची उकल करताना दिसत आहेत. 


'केरळ क्राईम फाईल्स' ही सीरिज प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करते. ट्विस्टवर या सीरिजला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. "केरळ क्राईम फाईल्सची खूप उत्सुकता आहे. आता या सीरिजची प्रतीक्षा आहे","या सीरिजमधील रहस्य प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे आहेत", अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.  














टीझर पाहा : 



संबंधित बातम्या


The Kerala Story : 'द केरळ स्टोरी' च्या कमईत घसरण; 20 व्या दिवशी केली एवढी कमाई