The Vaccine War Review: कोरोनाचा तो भयंकर काळ आपण कदाचित कधीच विसरु शकणार नाही. आपण तो काळ विसरु शकणार नाही जेव्हा आपण सर्वांनी मृत्यूला जवळून पाहिले आणि मृत्यूचे सर्वात भयानक रूप पाहिले. पण नंतर सर्व गोष्टी व्यवस्थित झाल्या. पण सर्व गोष्टी सुरळीत कशा झाल्या? लस कशी बनवली गेली? विवेक अग्निहोत्री यांच्या द वॅक्सिन वॉर (The Vaccine War) या चित्रपटात अशा गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत, ज्याकदाचित आपल्याला माहित नसतील.
चित्रपटाची कथानक
द वॅक्सिन वॉर चित्रपटाची कथा ही सर्व सामान्य कथा नाहीये. हा चित्रपट थ्रिलर नाहीये पण ही कथा खूप महत्त्वाची आहे.आपल्याला पुन्हा जीवन मिळण्याची ही कहाणी आहे. लस कशी बनवली गेली? हे या कथेमध्ये दाखवण्यात आले आहे. लस कशी तयार झाली? त्यावेळी कोणती आव्हाने होती? आपण परदेशातून ही लस का घेतली नाही? कोण विरोधात होते? माध्यमांची यामध्ये काय भूमिका होती? सोशल मीडियाने या दरम्यान काय केले? या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या चित्रपटात मिळतील.
कसा आहे चित्रपट?
कोणताही गोंगाट, आरडाओरडा असणारा हा चित्रपट नाही. हा चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षक थिएटरमध्ये नाचत नाहीत तसेच नायक 10 गुंडांना मारत नाही पण तरी देखील हा चित्रपट तुम्हाच्या मानला भिडतो कारण आपण सर्वजण कोरोनाचा तो काळ जगलो आहोत. पण या चित्रपटात असे दिसते की, एका पत्रकाराच्या कथेला अधिक फुटेज दिले गेले आहे. तरी देखील तुम्ही या चित्रपटासोबत कनेक्ट होता. या चित्रपटामधून तुम्हाला अशा काही प्रश्नांची उत्तरे मिळतात ज्यांचा तुम्ही विचारही केला नसेल.
नाना पाटेकर हे अशा लेव्हलचे अभिनेते आहे ज्यांच्या अभिनयाचा रिव्हू करता येऊ शकत नाही.ते व्यक्तिरेखा जगतात. द वॅक्सिस वॉर या चित्रपटातील आपल्या व्यक्तिरेखा त्यांनी इतकी चांगल्या पद्धतीनं साकारली आहे की त्यांच्याकडे बघून समजेल की, असा अभिनय हा फार कमी अभिनेते करू शकतात. पल्लवी जोशी यांनी देखील अप्रतिम काम केले आहे. त्यांनी साकारलेली शास्त्रज्ञांची भूमिका तुमच्यासोबत कनेक्ट होते. रायमा सेननं पत्रकाराची भूमिका चांगल्या पद्धतीनं साकारली आहे.अनुपम खेर यांची भूमिका छोटी असली तरी त्यांनी ती उत्तर प्रकारे साकारली आहे.
दिग्दर्शन - द कश्मीर फाईल्सनंतर तर विवेक अग्निहोत्री यांची लीग बदलली आहे. या चित्रपटानंतर त्यांनी सिद्ध केले आहे की ते अशा कथा चांगल्या प्रकारे बनवू शकतात. ज्याचा लोक विचारही करत नाहीत . त्यांनी चित्रपटासाठी केलेले संशोधन दिसून येते. चित्रपटावरील त्याची हुकूमत दिसून येते. जेव्हा एखादा दिग्दर्शक एक स्ट्राँग स्टोरी सांगतो तेव्हा त्याचे कौतुक केले पाहिजे.
एकंदरीत हा चित्रपट पाहिलाच पाहिजे. कारण गोष्टी जाणून घेणे महत्वाचे आहे. जेणे करून आपण येणाऱ्या पिढीला कोरोनाच्या काळात काय घडले? हे सांगू शकतो.