Suriya Visited Fan House : दाक्षिणात्य सुपरस्टार सूर्या (Suriya) सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. अभिनेत्याच्या चाहत्याचा रस्ते अपघातात मृ्त्यू झाला आहे. चाहत्याचा मृत्यू झाल्याचं कळताच कुटुंबाला धीर द्यायला सुपरस्टार चाहत्याच्या घरी गेला होता. चाहत्याच्या कुटुंबीयांचं सांत्वन करतानाचे सूर्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 


दाक्षिणात्य सुपरस्टार सूर्याचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे चाहत्याच्या कुटुंबाला धीर देतानाचे अभिनेत्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याआधी अनेकदा सूर्या चाहत्यांची काळजी घेताना दिसून आला आहे. त्यामुळे चाहतेदेखील सूर्यावर खूप प्रेम करतात. 






सूर्याच्या फॅन पेजने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये सूर्या चाहत्याच्या फोटोजवळ हात जोडताना दिसत आहे. तर दुसऱ्या एका फोटोमध्ये तो चाहत्याच्या कुटुंबीयांना धीर देताना दिसत आहे. 


सूर्याच्या आगामी सिनेमांबद्दल जाणून घ्या... (Suriya Upcoming Movies)


सूर्या सध्या 'कंगुवा' सिनेमाचं शूटिंग करत आहे. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय सिने-दिग्दर्शन शिवा या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहे. या सिनेमात तो बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. या सिनेमाचं शूटिंग पूर्ण झाल्यानंतर तो 'सूर्या 43' या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. सुधा कोंगारा यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. 'वेत्रिमारन' आणि 'इरुम्बु काई मायावी' हे सूर्याचे आगामी दाक्षिणात्य सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहेत. 






सूर्याचा 'जय भीम' हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमातील सूर्याच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक झालं. त्यानंतर तो 'नम्बी नारायण' या सिनेमात झळकला. 'जय भीम' हा सिनेमा जगभरातील सिनेरसिकांच्या पसंतीस उतरला आहे. सूर्याच्या (Suriya Sivakumar) आगामी सिनेमांची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.


संबंधित बातम्या


Suriya : दाक्षिणात्य सुपरस्टार सूर्या मुंबईकर होण्यासाठी सज्ज; मायानगरीतील आलिशान फ्लॅटसाठी मोजले कोट्यवधी रुपये