Thank You For Coming Review : भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) अभिनीत 'थँक्यू फॉर कमिंग' (Thank You For Coming) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा सिनेमा संपला तेव्हा वाटलं थँक्यू फॉर एंडिंग असं एक मीम सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण हा सिनेमा पाहताना मला या भावाला काय म्हणायचं आहे ते कळलं. एकता कपूरने (Ekta Kapoor) या सिनेमाची निर्मिती केली आहे. पण अशा पद्धतीच्या सिनेमाची निर्मितीची त्यांनी का केली असावी अशा प्रश्न वारंवार पडतो. आजकाल महिला सक्षमीकरणावर भाष्य करणाऱ्या अनेक कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. पण तुम्ही काहीही बनवाल आणि त्या गोष्टी आम्ही पाहू असं कसं काय वाटतं तुम्हाला?


'थँक्यू फॉर कमिंग' सिनेमाचं कथानक काय आहे? (Thank You For Coming Movie Story)


'थँक्यू फॉर कमिंग' हा एका वेगळ्या विषयावर भाष्य करणारा सिनेमा आहे. या सिनेमात एका मुलीची गोष्ट दाखवण्यात आली आहे. जिला सेक्स कसं करायचं हे माहिती नाही असं मुलं म्हणतात.  
आणि तिला आयुष्यात कधीच ऑर्गेझम झाला नाही. म्हणून ती ऑर्गेझम शोधू लागते… विचार करा. ऑर्गेज्मच्या शोधात आणि कोणाशीही झोपायला तयार... त्यामुळे या सिनेमाच्या कथेत कधीही काहीही घडते...ती मुलगी कोणाशीही काहीही करायला तयार असते...फक्त ऑर्गेझमसाठी... 'थँक्यू फॉर कमिंग' हा सिनेमा पाहायला सिनेमागृहात जाऊ नका. बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरलेला हा सिनेमा लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल.


'थँक्यू फॉर कमिंग' हा सिनेमा कसा आहे? 


'थँक्यू फॉर कमिंग' या सिनेमाचं कथानक पाहताना असं वाटतं की आपण खूप मागे राहिलो आहोत किंवा हा सिनेमा भविष्यासाठी बनवण्यात आला आहे. सुरुवातीपासूनच हा सिनेमा फक्त एकाच मुद्द्यावर केंद्रित आहे. अत्यंत आनंदाचा शोध आणि आपल्याला विचार करण्यास भाग पाडले जाते. सिनेमातील इंटीमेट सीनदेखील निराशाजनक आहेत. 


'थँक्यू फॉर कमिंग' या सिनेमाची कथा काही ठिकाणी जोडली जाते. पण प्रेक्षकांना बांधून ठेवण्यात हा सिनेमा कमी पडतो. हा सिनेमा कोणत्या ना कोणत्या पद्धतीने गर्दी जमवू शकतो.  पण एका चांगल्या सिनेमाला सुपरहिट होण्यासाठी चांगल्या कथानकाची गरज असते. क्लायमॅक्समुळे आपल्याला असं वाटतं की आपली फसवणूक झाली आहे.


करन बुलानी यांनी 'थँक्यू फॉर कमिंग' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. करणला एकतर सिनेमाची कथा नीट समजली नाही किंवा समजावून सांगता आली नाही. आधुनिकता, स्वातंत्र्य या गोष्टी समजावून सांगण्यास तो कमी पडला आहे. दिग्दर्शकाला या सिनेमाच्या माध्यमातून काय सांगायचं आहे हे आम्हाला समजलं नाही. यापेक्षा आणखी चांगला सिनेमा बनवता आला असतो. आणखी थोडी मेहनत घ्यायला हवी होती.