Kaala Paani Trailer Out : 'काला पानी' (Kaala Paani) या वेबसीरिजची घोषणा झाल्यापासून या सीरिजबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता आहे. काही दिवसांपूर्वी टीझर आऊट झाला आणि प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली. आता या वेबसीरिजचा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर आऊट झाला आहे.
'काला पानी' ही सीरिज नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. आता नेटफ्लिक्सने या सिनेमाचा ट्रेलर आऊट केला आहे. 'काला पानी' या सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
'काला पानी'च्या ट्रेलरमध्ये काय आहे? (Kala Paani Trailer Out)
'काला पानी' या वेबसीरिजचा ट्रेलर थरार-नाट्याने भरलेला आहे. ही आश्चर्यकारक सीरिज प्रेक्षकांना एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाईल.
अंदमान आणि निकोबार बेटांच्या काळ्या पाण्यात लोक कसे जगतात हे या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. 2 मिनिटे 32 सेकंदाचा ट्रेलर अतिशय मनोरंजक दृश्ये दर्शवितो आणि त्याच्या कथेभोवती रहस्य निर्माण करतो.'काला पानी' या वेबसीरिजची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. तसेच ट्रेलरचं कौतुक करत आहेत.
मराठी कलाकारांची फौज असलेली 'काला पानी'
'काला पानी' या सीरिजमध्ये मोना सिंह, आशुतोष गोवारीकर, अमेय वाघ, सुकांत गोयल, विकास कुमार, अरुशी शर्मा, राधिका मेहरोत्रा, चिन्मय मांडलेकर आणि पूर्णिमा इंद्रजीत महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 18 ऑक्टोबर 2023 रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही सीरिज रिलीज होणार आहे.
'काला पानी' या सीरिजबद्दल बोलताना आशुतोष गोवारीकर म्हणाले,"काला पानी' या सीरिजचं स्वत: एक विश्व आहे. अशा पद्धतीच्या एका कलाकृतीचा आणि नेटफ्लिक्सचा भाग होत असल्याचा मला आनंद आहे. या सीरीजसाठी मी खूप उत्सुक आहे. समीर, अमित आणि बिस्वपती यांनी या सीरिजची निर्मिती केली आहे. प्रेक्षकदेखील या सीरिजची आतुरतेने वाट पाहत आहेत". मोना सिंह म्हणाली,"काला पानी' ही सीरिज माझ्यासाठी खूप खास आहे. या वेबसीरिजमध्ये तुम्हाला थरार, नाट्य आणि अॅक्शन पाहायला मिळेल. समीर, अमित आणि नेटफ्लिक्सच्या टीमचा भाग असल्याचा मला आनंद आहे. या सीरिजचं उत्तम कथानक आहे".
संबंधित बातम्या