kabzaa review : 'केजीएफ 2' आणि 'कांतारा' या दाक्षिणात्य सिनेमांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. सिनेप्रेमींमध्ये दाक्षिणात्य सिनेमांची चांगलीच क्रेझ आहे. अशातच दाक्षिणात्य सुपरस्टार किच्चा सुदीपचा (Kichcha Sudeep) 'कब्जा' (Kabzaa) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हिंदीत हा सिनेमा 1600 स्क्रीन्सवर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा सिनेमा पाहिल्यानंतर प्रेक्षकांना KGF ची आठवण येईल एवढं मात्र नक्की. 


'कब्जा' या सिनेमाचं कथानक काय आहे? (Kabzaa Movie Story)


'कब्जा' या सिनेमाचं कथानक स्वातंत्र्यापूर्वीचं आहे. तिरंगा फडकवल्याच्या गुन्ह्यात एका स्वातंत्र्यसैनिकाला ब्रिटीश सरकारने फाशी दिली. त्यानंतर त्याची पत्नी त्यांच्या दोन मुलांसह दुसऱ्या शहरात स्थायिक झाली. त्याचा मुलगा अर्केश्वर (उपेंद्र) मोठा होऊन पायलट बनतो. अर्केश्वरचे वीर बहादूर (मुरली शर्मा) यांची मुलगी मधुमतीवर (श्रीया सरन) प्रेम असते. पण पायलट म्हणून अर्केश्वर पररतो तेव्हा त्याच्या भावाची माफिया डॉन खून करतो. 


अर्केश्वर आपल्या भावाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी अंडरवर्ल्डच्या जगात प्रवेश करतो. त्यानंतर तो एक खूप मोठा माफिया बनतो. पण वडिलांच्या इच्छेविरुद्ध मधुमतीशी लग्न करतो. याचा राग येऊन वीर बहादूर अर्केश्वराविरुद्ध एक कट रचतो. आता या पुढे काय पुढे हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना सिनेमाच पाहावा लागेल. 


'कब्जा' या सिनेमात रहस्यमय नाट्य आहे. आर चंद्रूने या सिनेमाच्या लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. सिनेमातील अनेक प्रसंग प्रेक्षकांना थक्क करतात. या सिनेमात उपेंद्रने उत्तम काम केलं आहे. तर श्रिया सरननेदेखील आपल्या भूमिकेला 100 टक्के दिले आहेत. किच्चा सुदीपचा अॅक्शन मोड चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. सिनेमाची सिनेमॅट्रोग्राफी उत्कृष्ट आहे. पण पटकथेच्या बाबतीत सिनेमा थोडा मागे पडला आहे. 


'कब्जा' या सिनेमाचं कथानक दमदार असतं तर हा सिनेमा अधिकाधिक प्रेक्षकांना आवडला असता. जर स्टंट आणि अॅक्शचा तडका असलेले सिनेमे आवडत असतील तर तुम्ही सिनेमागृहात जाऊन या सिनेमाचा आनंद घेऊ शकता. कन्नड, तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि हिंदी या पाच भाषांमध्ये हा सिनेमा रिलीज झाला आहे. या सिनेमाचं कथानक थोडं डार्क असल्यामुळे हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यात कमी पडला आहे. लवकरच या सिनेमाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या सिनेमातदेखील किच्ची सुदीपची झलक पाहायला मिळणार आहे. 


Kabzaa Trailer : अंगावर शहारे आणणारा किच्चा सुदीपच्या 'कब्जा'चा ट्रेलर आऊट; नेटकऱ्यांनी केली 'KGF'सोबत तुलना