Pathaan BTS Photo : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि दीपिका पादुकोणचा (Deepika Padukone) 'पठाण' (Pathaan) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. लवकरच हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणने एकाहून एक स्टंट आणि अॅक्शन सीक्वेन्स करताना दिसून आले आहेत. पण हे सीन्स करण्यासाठी दोघांनाही बॉडी डबलचा वापर केला आहे. सध्या 'पठाण' सिनेमाच्या सेटवरचा एक फोटो सध्या व्हायरल होत असून यात शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण बॉडी डबल्ससह पोज देताना दिसत आहेत.
'पठाण' ओटीटीवर होणार रिलीज!
'पठाण' हा सिनेमा 22 मार्च रोजी अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ (Amazon Prime Video) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. पठाण हा चित्रपट रिलीज होऊन 56 दिवस झाले आहेत. आता 56 दिवसांनंतर हा चित्रपट प्रेक्षकांना घरबसल्या पाहता येणार आहे.
शाहरुख खानचा अॅक्शन मोड, सिनेमातील गाणी, संवाद प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. सिद्धार्थ आनंदने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. शाहरुखसह या सिनेमात दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहमदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 'पठाण' या सिनेमावर रिलीजआधी मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. पण वादाच्या भोवऱ्यात अडकलेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात यशस्वी ठरला आहे.
बॉक्स ऑफिसवर 'पठाण'चा बोलबाला
'पठाण' या सिनेमाच्या माध्यमातून शाहरुखने चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं आहे. सिनेमावर टीका झाल्यानंतर शाहरुखने या सिनेमाचं प्रमोशनदेखील केलं नाही. पण तरीही लाडक्या सेलिब्रिटीचा सिनेमा पाहण्यासाठी चाहत्यांची पाऊले सिनेमागृहाकडे वळाली. चांगलं कथानक, उत्तम दिग्दर्शक, सिनेमाची योग्य बांधणी आणि उत्कृष्ट कलाकार असतील तर तो सिनेमा यशस्वी होतोच.
'पठाण'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन... (Pathaan Box Office Collection)
रिलीजच्या 50 दिवसांनंतरही 800 सिनेमागृहांत प्रदर्शित होणारा शाहरुखचा 'पठाण' हा पहिलाच हिंदी सिनेमा आहे. आतापर्यंत या सिनेमाने भारतात 521 कोटींची कमाई केली आहे. तर जगभरात या सिनेमाने 1043 कोटींचा गल्ला जमवला आहे. आता शाहरुख खानचा 'जवान' आणि 'डंकी' हे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहेत.
संबंधित बातम्या