Tejas Review:  'When in Doubt think about Nation',  हा  कंगनाच्या (Kangana Ranaut) 'तेजस' या चित्रपटातील डायलॉग आहे, म्हणजे तुमच्या मनात काही दुविधा असेल तर देशाचा विचार करा. मग हा चित्रपट बनवल्यानंतर तुम्ही देशाचा विचार केला नाही का? की, तुम्ही देशाच्या वायुसेनेच्या नावाने कोणत्या चित्रपटाची निर्मिती करत आहात? नक्कीच एअर फोर्स ही यापेक्षा चांगल्या चित्रपटाला  डिजर्व  करते. कंगनाचा तेजस चित्रपट बघून  पटकन कंटाळा येतो आणि लवकर झोप येते. चित्रपटाची एक चांगली गोष्ट ती म्हणजे, हा चित्रपट लवकर संपतो. तेही हृदयाला न भिडता.


चित्रपटाचे कथानक



ही कथा आहे तेजस गिल नावाच्या पायलटची, कंगनाने  तेजस  ही भूमिका साकारली आहे. ती केवळ तेजस विमानाची पायलट आहे. तिला एका मिशनवर जायचे असते. आता हे देखील तुम्हाला समजले असेल की, मिशन पाकिस्तानात आहे.   पाकिस्तानात भारताविरुद्ध कट रचणारे काही दहशतवादी आहेत.  तेजस या मोहिमेत यशस्वी होतो की नाही? हे या चित्रपाटमध्ये दाखवण्यात आले आहे . अशा कथा आपण वर्षानुवर्षे ऐकत आहोत. तीच ऐकलेली कथा या चित्रपटात पाहायला मिळते.  


चित्रपट कसा आहे?



हा चित्रपट तुम्हाला सुरुवातीपासूनच कंटाळवाणा वाटतो.  कुणालातरी वाचवण्यासाठी नायिकेचा एंट्री सीन, तिचा भूतकाळ आणि मग मिशन हे सर्व चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. साधारणपणे जेव्हा एखादा स्टार वर्दी परिधान करतो तेव्हा थिएटर जल्लोषाने भरून जायला हवे. विशेषत: कंगनासारखी अप्रतिम अभिनेत्री जर भूमिकेत असेल तर उत्साह द्विगुणित व्हायला हवा. पण इथे तुम्हाला कंटाळा येतो. चित्रपट कुठेही तुमच्या हृदयाला भिडत नाही.असा एकही सीन नाही जो  पाहण्याचा आनंद तुम्ही घेता. चित्रपटातील VFX खूप वाईट आहेत. ते व्हिडीओ गेमसारखे दिसतात. हा चित्रपट पाहताना तुम्हाला प्रश्न पडतो की, या चित्रपटाच्या निर्मात्यांनी हा चित्रपट  पाहिला असेल का? जर याचे उत्तर हो असेल, तर त्यांनी त्यात बदल का केला नाही? चित्रपटात अयोध्येचं राम मंदिर सुद्धा चित्रपटात दाखवलं आहे पण श्री राम सुद्धा या चित्रपटाला वाचवू शकले नाहीत. आपल्या हवाई दलावर यापेक्षा चांगला चित्रपट बनवायला हवा होता.


कलकारांचा अभिनय


सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली देखील कधी कधी शून्यावर आऊट होतात. कंगनासोबतही असंच झालंय .ती एक अप्रतिम अभिनेत्री आहे  पण इथे  स्क्रिप्ट आणि पटकथेमुळे कंगना काहीच करू शकत नाही. ती वर्दीत अप्रतिम दिसते पण फक्त अप्रतिम दिसल्याने चालत नाही. ती इंस्टाग्रामवरही अप्रतिम दिसतेच की, पण  लोक चित्रपट पाहायला गेले आणि त्यांची निराशा झाली.अंशुल चौहाननं देखील पायलटची भूमिका साकारली आहे. चित्रपटात पायलटची भूमिका  साकारणारी  ती एकटीच आहे, जिने मला प्रभावित केले .तिचा अभिनय खूपच चांगला आहे. वरूण मित्रा आणि आशिष विद्यार्थी सुद्धा छान आहेत पण एकूणच चित्रपटाचे लेखन खराब आहे त्यामुळे कलाकार काय करू शकतात?


दिग्दर्शन  



सर्वेश मेवरा यांचे दिग्दर्शन आणि लेखन दोन्ही अगदी सरासरी आहे. लोकांशी कनेक्ट होईल, असे काहीही तो चित्रपटात टाकू शकला नाही. 


संगीत 



चित्रपटाचे संगीत ठीक आहे. चित्रपटात जेव्हा गाणी  येतात तेव्हा तुम्ही त्यांचा आनंद लुटता  शाश्वत सचदेव यांनी चित्रपटाला संगीत दिले आहे. चित्रपटामधील दिल है रांझना आणि सैयान, ही गाणी खूप छान वाटतात.


कंगनाने तिच्या अभिनयाने स्वत:चे एक स्थान निर्माण केले आहे.  या चित्रपटानंतर आता ती कोणता चित्रपट करतेय ते पाहावे लागेल..  ती हिरोशिवाय चित्रपट करणारी आहे. ती स्वतःच्या बळावर चित्रपट चालवते. म्हणून चित्रपटातही तशी ताकद असायला हवी.