Khufiya Review: विशाल भारद्वाज (Vishal Bhardwaj) हे हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज फिल्ममेकर्सपैकी एक आहेत. त्याने मकबूल, ओंकार, हैदर यांसारखे चित्रपट बनवले आहेत आणि अप्रतिम संगीतही दिले आहे. पण काही काळासाठी त्यांची जादू पडद्यावर दिसली नाही. पण ती जादू पुन्हा परत आली आहे. त्यांचा नेटफ्लिक्सवर (Netflix) खुफिया (Khufiya) नावाचा चित्रपट रिलीज झाला आहे.
चित्रपटाचे कथानक
खुफिया या चित्रपटाची कथा अमर भूषण लिखित Escape To Nowhere या कादंबरीवर आधारित आहे. ही कथा एक स्पाय थ्रिलर आहे, त्यामुळे चित्रपटाच्या कथेबाबत फार काही सांगणे योग्य नाही. चित्रपटाची कथा 2004 ची आहे. RAW कार्यालयातील कोणीतरी देशाच्या शत्रूंना माहिती देत आहे, ज्यामुळे देशाला धोका निर्माण होऊ शकतो. रॉ एजंट कृष्णा मेहरा म्हणजेच अभिनेत्री तब्बूला त्याचा सहकारी रवी मोहन म्हणजेच अली फजलवर संशय येतो.रवीची पत्नी चारू म्हणजेच वामिका गब्बी हिचीही चित्रपटात महत्त्वाची भूमिका आहे. एक एजंट बेपत्ता होतो.विदेशी एजन्सी रॉमध्ये घुसते .पण कोण आहे? हे नेटफ्लिक्सवर खुफिया चित्रपट पाहिल्यावरच कळेल.
कसा आहे चित्रपट?
विशाल भारद्वाज जेव्हा एखादा चित्रपट दिग्दर्शित करतो तेव्हा त्या चित्रपटाबाबत अपेक्षा वाढतात. पण तो त्या अपेक्षा पूर्ण करतो. त्याची चित्रपटावरची पकड सुरुवातीपासून दिसते. चित्रपटामध्ये तब्बू आणि वामिका या दोघांनीही खूप छान काम केलंय. हा चित्रपट नक्की पहा. मग तुमच्या लक्षात येईल की, विशालला हिंदी चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट फिल्ममेकर्सपैकी एक का मानले जाते?
कलाकारांचा अभिनय
तब्बू या चित्रपटाची मुख्य अभिनेत्री. तब्बू सध्या अप्रतिम काम करत आहे. या चित्रपटात देखील तिनं अप्रतिम अभिनय केला आहे. प्रत्येक सीनमध्ये तब्बू तिचा प्रभाव सोडते.अली फजलचा अभिनयही जबरदस्त आहे.
चित्रपटामध्ये कथेपासून दिग्दर्शन आणि अभिनयापर्यंत सर्व काही विलक्षणआहे. तुम्ही कशाची वाट पाहत आहात? हा चित्रपट नक्की बघा.एकूणच हा चित्रपट तुमचे भरपूर मनोरंजन करतो. फरहाद अहमद देहलवी यांनी या चित्रपटाची छायांकन केलं आहे. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर घरबसल्या तुम्ही हा चित्रपट पाहू शकता. अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तब्बूच्या खुफिया या चित्रपटाच्या कथानकाचे कौतुक केलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: