Khufiya Trailer Out: ओटीटीवर विविध विषयांवर आधारित असणाऱ्या सीरिज आणि चित्रपट रिलीज होतात. लवकरच एक थ्रिलर चित्रपट नेटफ्लिक्स (Netflix) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. या चित्रपटाचं नाव खुफिया (Khufiya) असं आहे. खुफिया या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या ट्रेलरमध्ये अॅक्शन, ड्रामा, सस्पेन्स या सर्व गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत.
नेटफ्लिक्सच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर खुफिया या चित्रपटाचा ट्रेलर शेअर करण्यात आला आहे. या ट्रेलरला कॅप्शन देण्यात आलं, 'यहां हथियार के रूप हैं अलग, और जंग है खुफिया, हेरांच्या दुनियेतील गद्दारांना समोर आणलेच पाहिजे.'
खुफिया चित्रपटाची स्टार कास्ट
तब्बू, अली फजल, वामिका गाबी, आशिष विद्यार्थी, एलेक्स ओ'नेल आणि शताफ फिगर या कलाकारांनी खुफिया या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. विशाल भारद्वाज यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. खुफिया या चित्रपटात प्रेम, निष्ठा, सूड, विश्वासघात या सर्व गोष्टी दाखवण्यात येणार आहेत. रोहन नरुला आणि विशाल यांनी खुफिया या चित्रपटाची स्क्रिप्ट लिहिली आहे.
पाहा ट्रेलर:
‘खुफिया’ या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. ट्रेलरमधील अली जफरच्या भूमिकेला प्रेक्षकांमध्ये खूप पसंती मिळत आहे. त्याचबरोबर ‘खुफिया’ चित्रपटाच्या ट्रेलरमधील तब्बूच्या अभिनयाने अनेकांची मने जिंकली आहेत. ‘खुफिया’ या चित्रपटात तब्बू ही कृष्णा मेहरा ही भूमिका साकारत आहे. तर अली फजल हा देव ही भूमिका साकारत आहे.
कधी रिलीज होणार चित्रपट?
‘खुफिया’ हा चित्रपट R&AW च्या काउंटर एस्पोनेज युनिटचे माजी प्रमुख अमर भूषण यांच्या पुस्तकावर आधारित आहे. 'खुफिया' हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 5 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत.
अभिनेत्री तब्बू ही तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. तिच्या अंधाधुन या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. तसेच अली फजल हा मिर्झापूर या सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीस आला. आता या दोघांचा ‘खुफिया’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
संबंधित बातम्या: