Chandramukhi 2 Movie Review : सिनेसृष्टी बहरली आहे. एकापेक्षा एक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. एकीकडे 'जवान' (Jawan) सिनेमा धमाका करत असताना 'फुकरे 3' आणि 'द व्हॅक्सिन वॉर' हे सिनेमेदेखील प्रदर्शित झाले आहे. आता बॉलिवूडची 'पंगाक्वीन' कंगना रनौतचा (Kangana Ranaut) 'चंद्रमुखी 2' (Chandramukhi 2) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
'चंद्रमुखी' हा सिनेमा सुपरहिट ठरला होता. त्यामुळे या सिनेमाकडून प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा होत्या. आता हा सिनेमा प्रदर्शित झाल्याने प्रेक्षक सिनेमागृहात जाऊन हा सिनेमा पाहत आहेत. आता हा सिनेमा प्रदर्शित झाला असून या सिनेमाला प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.
'चंद्रमुखी 2'चं कथानक काय आहे? (Kangana Ranaut Chandramukhi 2 Movie Story)
'चंद्रमुखी 2' या सिनेमाचं कथानक एका श्रीमंत कुटुंबाभोवती फिरणारं आहे. काही कारणाने पूजा करण्यासाठी हे श्रीमंत कुटुंब त्यांच्या वडिलोपार्जित घरी येतं. पण नकळक चंद्रमुखी आणि वैटियन राजा पुन्हा जागे होतात. आता चंद्रमुखी आणि वैटियन राजा आमने-सामने आल्याने आता पुढे काय होणार हे प्रेक्षकांना सिनेमातच पाहावं लागेल. विनोद आणि भय असणारा हा सिनेमा प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करणार आहे. 'चंद्रमुखी 2' हा सिनेमा 2005 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'चंद्रमुखी' सिनेमाचा पुढचा भाग आहे. या सिनेमाच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागात सिनेरसिकांना एक साम्य दिसेल.
कंगनाचा रौद्र अवतार
'चंद्रमुखी 2' या सिनेमात कंगना रनौत (Kangana Ranaut) आणि राघव लॉरेंस (Raghav Lowrence) मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमात राघवने वैत्तियन राजाची भूमिका साकारली आहे. तर 'पंगाक्वीन' कंगना रनौत 'चंद्रमुखी 2'च्या भूमिकेत आहे. राघवने आपल्या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. त्याचं विनोदाचं टायमिंग कमाल आहे. तर दुसरीकडे 'पंगाक्वीन'ने आपली भूमिका चोख बजावली आहे. कंगनाचा रौद्र अवताराचं कौतुकचं.
'चंद्रमुखी 2' हा सिनेमा प्रेक्षकांना शेवटपर्यंत खुर्चीचा खिळवून ठेवणारा आहे. सिनेमाचा दुसरा भाग प्रेक्षकांना एका वेगळ्याच जगात घेऊन जातो. या सिनेमातील सर्वच कलाकारांनी चांगलं काम केलं आहे. पी वासु यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.
'चंद्रमुखी 2' या सिनेमात कंगना रनौतसह, राघव लॉरेंस, वडिवेलु, राधिका शरतकुमार, महिमा नांबियार, लक्ष्मी मेनन, सृष्टी डांगे महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. सुभाषकरण अलीरजा यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. या सिनेमातील गाणीदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणारी आहेत.