Parineeti Chopra Raghav Chadha O Piya Song : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि राघव चड्ढा (Raghav Chadha) उदयपूरमध्ये लग्नबंधनात अडकले आहेत. कुटुंबीय आणि जवळच्या मित्रमंडळींच्या उपस्थितीत त्यांनी लग्न केलं आहे. आता परिणीतीने राघव चड्ढा यांना खास भेट दिली आहे. लग्नासाठी अभिनेत्रीने एक गाणं रेकॉर्ड केलं आहे. 


परिणीती आणि राघव यांच्या शाही विवाहसोहळ्याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. आता ते लग्नबंधनात अडकले असून त्यांचे लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आता परिणीतीने राघव यांना एकदम खास भेट दिली आहे. राघव यांच्या आठवणीत ही गोष्ट कायम राहणार आहे. 


परिणीतीने राघव यांच्यासाठी गायलं 'हे' गाणं


परिणीती चोप्रा एक लोकप्रिय अभिनेत्री असण्यासोबत गायिकादेखील आहे. अनेकदा ती गाणी गातानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. आता परिणीतीने राघव चड्ढा यांच्यासाठी 'ओ पिया' (O Piya) हे गाणं गायलं आहे. 


मीडिया रिपोर्टनुसार, परिणीतीने राघव चड्ढा यांच्यासाठी 24 सप्टेंबरला लग्नसोहळ्यात 'ओ पिया' हे गाणं गायलं आहे. सनी एमआर, हरजोत कौर आमि गौरव दत्ता यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं आहे. चाहते आता युट्यूबवर हे गाणं ऐकू शकतात. 


मुंबईत होणार ग्रँड रिसेप्शन


परिणीती आणि राघव लग्नानंतर दिल्लीला गेले आहे. दिल्ली आणि चंढीगढमध्ये त्यांचं रिसेप्शन होणार असल्याची माहिती समोर आली आहे. आता दिल्लीतील रिसेप्शन रद्द केल्याचं समोर आलं आहे. आता राघव आणि परिणीती यांचं मुंबईत रिसेप्शन होणार आहे. या रिसेप्शनला दोघांचेही जवळचे मित्रमंडळी सहभागी होणार आहेत. तसेच बॉलिवूड सेलिब्रिटीदेखील या रिसेप्शनला उपस्थित असणार आहेत. 4 ऑक्टोबरला हे रिसेप्शन होणार आहे. 


उदयपूरमधील 'द लीला पॅलेस'मध्ये परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा लग्नबंधनात अडकले आहेत. या लग्नसोहळ्याला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मानदेखील हजर होते. परिणीती आणि राघव यांच्या लग्नसोहळ्याचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दोघांनाही चाहते सुखी संसारासाठी शुभेच्छा देत आहेत. 


परिणीतीचा लग्नसोहळ्याचा लेहेंगा सेलिब्रिटी फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने डिझाइन केला आहे. तर राघव चड्ढा यांनी फॅशन डिझायनर पवन सचदेवा यांनी डिझाइन केलेला आऊटफिट परिधान केला होता. पंजाबी रितीरिवाजानुसार त्यांनी लग्न केलं आहे. 



संबंधित बातम्या


Parineeti Chopra Raghav Chadha: "या सुंदर प्रवासाला सुरुवात करत असताना..."; राघव चड्ढा यांनी शेअर केली खास पोस्ट