Fighter Movie Review : 26 जानेवारीला दरवर्षी अनेक देशभक्तिपर सिनेमे (Movies)  प्रदर्शित होतात. यंदादेखील 'फायटर' (Fighter) हा बहुचर्चित सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सिद्धार्थ आनंदने (Siddharth Anand) या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. हृतिक रोशन (Hrithik Roshan), दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि अनिल कपूर (Anil Kapoor) या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 26 जानेवारीला एखादा चांगला सिनेमा पाहायचा असेल 'फायटर' हा सिनेमा परफेक्ट आहे.


'फायटर'चं कथानक काय आहे? (Fighter Movie Story)


'फायटर' हा सिनेमा पुलवामा हल्ल्यावर आधारित आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कर पाकिस्तानवर कसं हवाई हल्ला करतं हे या सिनेमात दाखवण्यात आलं आहे. या सिनेमात अनेक ट्विस्ट अॅन्ड टर्न आहेत. हृतिक रोशन या सिनेमात वैमानिकाच्या भूमिकेत आहे. पण त्याचे सीनियर अनिल कपूर त्याच्यावर नाराज आहेत. दीपिका पादुकोणदेखील या सिनेमात वैमानिकेच्याच भूमिकेत आहे. एकंदरीतच हा सिनेमा देशभक्तिच्या रंगात रंगलेला दिसत आहे.


'फायटर' कसा आहे? 


'फायटर' या सिनेमाच्या फर्स्ट हाफमध्ये भावनांपेक्षा स्टाईलवर भर देण्यात आला आहे. हृतिक-दीपिकाची केमिस्ट्री कमाल वाटते. फायटिंगचे सीन्स ठिक आहेत. पण पहिलं मिशन लवकरच पूर्ण झाल्यासारखं वाटतं. सेकंद हाफ पाहायला मात्र मजा येते. हा सिनेमा खूपच भावनिक आहे. हृतिक जेव्हा जय हिंदच्या घोषणा देत पाकिस्तानी आतंकवाद्यांना मारतो तेव्हा सिनेमागृहात टाळ्यांचा कडकडाट होतो. सिनेमाचा दुसरा भाग खूपच कमाल आहे. सिनेमाचं कथानक साधं असलं तरी देशभक्तिमुळे ते एका वेगळ्या उंचीवर गेलं आहे.


कलाकारांच्या अभिनयाची कमाल


'फायटर' सिनेमात हृतिकने चांगला अभिनय केला आहे. त्याचा स्क्रीन प्रेजेंस कमाल आहे. हृतिकला स्क्रीनवर पाहताना मजा येते. दीपिकानेदेखील चांगलं काम केलं आहे. त्याच्या अभिनयाचंही कौतुक. अनिल कपूरदेखील शानदार आहे. करण सिंग ग्रोवरनेदेखील आपली भूमिका चोख निभावली आहे. अक्षय ओबेरॉयदेखील आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडतो. एकंदरीतच सिनेमाचं कास्टिंग उत्तम झालं आहे. मुकेश छाब्रा यांना या गोष्टीचं क्रेडिट जातं. 


'फायटर'आधी सिद्धार्थ आनंदचा (Siddharth Anand) 'पठाण' (Pathaan) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. सिद्धार्थने फायटरच्या पटकथेवर आणखी लक्ष द्यायला हवं होतं, असं वाटतं. कुठेकुठे सिनेमा थोडा नाट्यमय वाटतो. संचित बल्हारा आणि अंकित बल्हारा यांनी या सिनेमाला संगीत दिलं आहे. 'फायटर' हा सिनेमा 26 जानेवारी 2024 रोजी नक्की पाहा.