Anil Kapoor and Hrithik Roshan : अभिनेता हृतिक रोशनच्या (Hrithik Roshan) आगामी फायटर या सिनेमाबाबत प्रेक्षकांना उत्सुकता आहे. फायटर या सिनेमात हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि दीपिका पादुकोण (Deepika Padukone) हे मुख्य भूमिकेत असणार आहेत. दरम्यान, फायटर प्रदर्शित होण्यापूर्वी अभिनेता हृतिक रोशन, अनिल कपूर (Anil Kapoor) यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या पत्रकार परिषदेत हृतिक रोशनने अनिल कपूर यांचे तोंडभरुन कौतुक केले. हृतिककडून कौतुक होताच अनिल कपूर यांना अश्रू अनावर झाले आहेत.
नेमकं काय घडलं? (Anil Kapoor and Hrithik Roshan)
पत्रकारांशी संवाद साधताना हृतिक म्हणाला, "मी अनिल कपूर यांना लहानपणापासून पाहत आलो आहे. त्यांना पाहातच मी मोठा झालो. मी त्यांच्याकडून बरेच काही शिकलो. फायटरमध्ये त्यांचा एक सीन होता. त्यांनी या सीनमध्ये जबरदस्त अभिनय केला. मी सेटवर त्यांचा अभिनय पाहून चकित झालो होतो. सीन शूट झाल्यानंतर मी त्यांना जाऊन म्हणालो की, सीन फार चांगल्या पद्धतीने शूट झाला आहे." हृतिककडून है कौतुक होत असतानाच अनिल कपूर यांना अश्रू अनावर झाले आहेत.
पुढे बोलताना हृतिक म्हणाला, "आजही एखाद्या सीनसाठी अनिल कपूर जीव ओतून काम करतात. त्यांचा अभिनय पाहून पुन्हा एकदा वाटले की, त्यांचा असिस्टंट व्हावे." एकीकडे हृतिक अनिल कपूर यांचे कौतुक करताना दिसत होता. तर दुसरीकडे हृतिकला ऐकताना अनिल कपूर चांगलेच भावुक झालेले पाहायला मिळाले. पण हे अनिल कपूर यांचे आनंदाचे अश्रू होते.
25 जानेवारीला प्रदर्शित होणार फायटर (Fighter)
अनिल कपूर यांच्याबाबत बोलताना हृतिक म्हणाला, आजवर त्यांनी उकृष्ट अभिनेत्यांबरोबर काम केले नव्हते. दरम्यान, दीपिका आणि हृतिक यांची मुख्य भूमिका असलेला सिनेमा गुरुवारी (दि.25) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात दीपिका, हृतिक आणि अनिल कपूर यांच्याशिवाय, करण सिंह ग्रोव्हर, सजिंदा शेख आणि अक्षय ओबेरॉयही दिसणार आहेत. फायटरच्या माध्यमातून दीपिका आणि हृतिक पहिल्यांदाच एकत्र पाहायला मिळणार आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या