Sussanne Khan : अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) यांची मुख्य भूमिका असलेला फायटर (Fighter) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अभिनेता हृतिक आणि अनिल कपूर यांनी सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी बुधवारी (दि.24) पत्रकारांशी संवाद साधला होता. हृतिकचा फायटर (Fighter) कसा असणार? याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. आज गुरुवारी (दि.25) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. दरम्यान, फायटर सिनेमा कसा आहे? या बाबत हृतिकच्या विभक्त पत्नीने भाष्य केले आहे. हृतिकची विभक्त पत्नी सुजैन खान नेमकं काय म्हणाली जाणून घेऊयात..
सुजैन खान काय म्हणाली?
हृतिकची विभक्त पत्नी सुजैन खान हिने फायटर सिनेमाचे कौतुक केले आहे. तिने फायटरचे (Fighter) पोस्टर इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहे. याशिवाय तिने फायटरच्या संपूर्ण टीमला शुभेच्छाही दिल्या आहेत. हृतिक आणि सुजैनचा घटस्फोट झाला असला तर ते नेहमी एकमेकांना सपोर्ट करताना दिसतात. फायटर सिनेमा रिलीज झाल्यानंतर सुजैनने ही संधी सोडलेली नाही.
हृतिक रोशन आणि सुजैन खान यांच्यामध्ये घटस्फोट झाल्यानंतरही चांगली मैत्री आहे. दोघेही त्यांच्या मुलांचा चांगल्या पद्धतीने सांभाळ करतात. सुजैन खान शिवाय राकेश रोशन यांनाही फायटर हा सिनेमा आवडला आहे. राकेश रोशन फायटरबाबत बोलताना म्हणाले की, "फायटर बेस्ट आहे. हृतिक बेस्ट आहे. अनिल कपूरही बेस्ट आहे. संपूर्ण टीमला सलाम" अशी प्रतिक्रिया राकेश रोशन यांनी दिली आहे. फायटरमध्ये दीपिका आणि हृतिकची केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या दिवशी सिनेमा 25 कोटी कमावेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
फायटरमध्ये (Fighter) नौदलाच्या समर्पणाबाबत आणि त्यागाबाबत भाष्य करण्यात आले आहे. 26 जानेवारीच्या पूर्वसंध्येला देशभक्तीवर आधारित सिनेमा रिलीज झाला आहे. हृतिकची विभक्त पत्नी सिनेमा रिलीज होण्यापूर्वी यशराज स्टुडिओमध्ये दाखल झाली होती. याशिवाय हृतिकची प्रियसी सबाब आझादही फायटरच्या स्क्रीनिंगसाठी उपस्थित होती. सुनैना रोशन आणि पश्मिना रोशन एकाच कारमध्ये दाखल झाले होते. फायटरच्या पत्रकार परिषदेतील आणि स्क्रीनिंगचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या