Apurva Movie Review : बॉलिवूड अभिनेत्री तारा सुतारियाचा (Tara Sutaria) 'अपूर्वा' (Apurva) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तारा सुतारियाचा दमदार अभिनय पाहण्यासाठी तुम्ही हा सिनेमा नक्की पाहा. एक अविवाहित मुलगी काय करू शकते हे जाणून घेण्यासाठी हा सिनेमा नक्की पाहा. 


'अपूर्वा' या सिनेमात खास असं काही नसलं तरी हा सिनेमा खूप स्पेशल आहे. कटी मुलगी काय करू शकते... मुलगी एकटी असेल तर कोणी काही करू शकत नाही हे सांगणारा हा सिनेमा आहे. या सिनेमाचा सेट महागडा नाही किंवा परदेशी लोकेशन्सवर या सिनेमाचं शूट झालेलं नाही. पण तरीही हा सिनेमा प्रेक्षकांना गुंतवून ठेवतो. 


'अपूर्वा'चं कथानक काय आहे? (Apurva Movie Review)


'अपूर्वा' नामक एका मुलीची गोष्ट सांगणारा 'अपूर्वा' हा सिनेमा आहे. सिनेमाची कथा आहे एका अपूर्वा नावाच्या मुलीची जी आपल्या पतीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आग्रा येथे जात आहे. चार दरोडेखोर ती प्रवास करत असलेल्या सरकारी बसला लुटतात आणि तिचे अपहरण करून तिला सोबत घेऊन जातात. चौघांना तिच्यावर बलात्कार करायचा आहे. आता पुढे काय घडते हे जाणून घेण्यासाठी तुम्ही डिस्नी प्लस हॉटस्टारवर हा सिनेमा पाहू शकतात. 96 मिनिटांचा हा सिनेमा अविवाहित मुलीच्या हिंमतीबद्दल भाष्य करतो. आयुष्यात आलेल्या समस्यांचा सामना ती कशी करते ते या सिनेमात दाखवण्यात आले आहे.


तारा सुतारियाने 'अपूर्वा'मध्ये चांगलं काम केलं आहे. अपूर्वाचं पात्र ती पूर्णपणे जगली आहे. आजवर तारा सुतारियाचं ग्लॅमरस रूप पाहायला मिळालं आहे. पण या सिनेमात तिच्या अभिनयाची झलक दिसून आली आहे. अशा पद्धतीची मुख्य भूमिका असलेला तिचा पहिलाच सिनेमा आहे. ताराचा अभिनय पाहण्याजोगा आहे.


'अपूर्वा' हा सिनेमा तुम्हाला जोडून ठेवतो. अभिषेक बॅनर्जीने कमाल काम केलं आहे. राजपाल यादवने मात्र प्रेक्षकांना निराश केलं आहे. यापेक्षा चांगलं काम तो करू शकला असता. धैर्य करवाने मात्र चांगल काम केलं आहे. सुमित गुलाटीने गँगस्टरची भूमिका चोख निभावली आहे. 


'अपूर्वा' कसा आहे? 


'अपूर्वा' हा खूपच अप्रतिम सिनेमा नसला तरी एकदा पाहायलाच हवा. 'अपूर्वा'सारखे सिनेमे तुम्हाला हिंमत देतात. अपूर्वा हा सिनेमा सुरुवातीपासून रंजक आहे. योग्य ठिकाणी फ्लॅशबॅकचा वापर करण्यात आला आहे. निखिल भटने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. मोठे सेट्स, बडे कलाकार या गोष्टींचा वापर न करता एक चांगला सिनेमा बनवता येतो हे या सिनेमाने दाखवून दिलं आहे.