Apurva Trailer: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री तारा सुतारिया (Tara Sutaria) ही तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत असते. चित्रपट निर्माता करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ द इयर 2' या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या ताराने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. ताराचा 'अपूर्वा' (Apurva) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तिच्या या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरमधील ताराच्या अभिनयाचं सध्या अनेकजण कौतुक करत आहेत. 


तारा सुतारिया ही 'अपूर्वा' या थ्रिलर चित्रपटाद्वारे ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे. 'अपूर्व' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. Disney Plus Hotstar  या ओटीटी   प्लॅटफॉर्मच्या  YouTube चॅनेलवर 'अपूर्व' चित्रपटाचा  ट्रेलर शेअर करण्यात आला आहे. ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलं आहे की,  अपूर्वा  नावाच्या तरुणीचे लग्न सिद्धार्थ नावाच्या मुलाशी होणार आहे. अपूर्वा आणि सिद्धार्थ यांच्या लग्नाची तयारी सुरु असते अशातच  काही गुंड अपूर्वाचे अपहरण करतात. या गुंडांच्या तावडीतून आपला जीव वाचवण्यासाठी अपूर्वा  धडपड करते. 


'अपूर्वा' कधी होणार रिलीज?


'अपूर्वा' या चित्रपटात  तारा सुतारियासोबतच अभिषेक बॅनर्जी, राजपाल यादव आणि धैर्य करवा या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.  'अपूर्वा' हा चित्रपट 15 नोव्हेंबर रोजी रिलीज होणार आहे. हा चित्रपट Disney Plus Hotstar  या ओटीटी   प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. काही दिवसांपूर्वी 'अपूर्वा'  या चित्रपटाचा टीझर देखील रिलीज झाला होता. या टीझरला देखील नेटकऱ्यांची पसंती मिळाली होती.


पाहा ट्रेलर:






तारा सुतारियाचा गेल्या वर्षी 'एक व्हिलन रिटर्न्स' (Ek Villain Returns )  हा चित्रपट रिलीज झाला होता.जॉन अब्राहम (John Abraham), अर्जुन कपूर (Arjun Kapoor),  आणि दिशा पाटनी (Disha Patani)  यांनी देखील या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली होती. या चित्रपटानंतर  तारा सुतारियाच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते. तारा सुतारिया ही सोशल मीडियावर देखील अॅक्टिव असते. इन्स्टाग्रामवर तिचे 8.8 मिलियन फॉलोवर्स आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या:


Ott Release This Week: प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी; या आठवड्यात रिलीज होणार जबरदस्त चित्रपट आणि वेब सीरिज