12th Fail Review : '12th फेल' (12th Fail) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमात एक सीन असा आहे की, एक विद्यार्थी आयएएस अधिकारी (IAS Officer) होऊ शकत नाही. त्यावेळी तो खोटं बोलत आहे, असं सांगितलं जातं. '12th फेल' हा खरंतर एक अप्रतिम सिनेमा आहे. हा सिनेमा पाहिल्यानंतर विक्रांत मैसीला राष्ट्रीय पुरस्कार मिळायला हवा, असं वाटतं.
'12th Fail' सिनेमाचं कथानक काय? (12th Fail Movie Story)
'12th Fail' या सिनेमात चंबलमध्ये राहणाऱ्या एका मुलाची गोष्ट दाखवण्यात आली आहे. गरीब कुंटुंबात जन्मलेल्या मनोजच्या वडिलांची नोकरी जाते. नोकरी जाण्यामागचं कारण त्यांचा प्रामाणिकपणा असतं. अशातच मनोज बारावीत नापास होतो. शाळेत असलेल्या प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्यामुळे मनोजला कॉपी करता आलेलं नसतं. त्यामुळे मनोजलादेखील त्या अधिकाऱ्यासारखं होण्याची इच्छा असते. त्यावेळी ती अधिकारी त्याला सांगतो की, तुला माझ्यसारखं व्हायचं असेल तर तुला चीटिंग करणं थांबवावं लागेल. त्यानंतर मनोजच्या संघर्षाला खऱ्या अर्थाने सुरुवात होते. आता मनोज आयपीएस अधिकारी बनणार का? आयपीएस अधिकारी होण्यापर्यंतचा त्याचा प्रवास कसा आहे? की त्याचं हे स्वप्नचं राहणार हे जाणून घेण्यासाठी सिनेमा पाहा.
'12th Fail' कसा आहे?
'12th Fail' हा सिनेमा पाहताना जाणवतं की हा सिनेमा आधी रिलीज झाला असता तर आपणही आयएएस अधिकारी झालो असतो. हा सिनेमा तुमच्या डोळ्यात पाणी आणण्यासोबत तुम्हाला प्रेरणा देतो. पहिल्या फ्रेमपासूनच हा सिनेमा तुम्हाला बांधून ठेवतो. दरम्यान मनोजच्या आयुष्यात एका मुलीची एन्ट्री होते. हा बिग बजेट सिनेमा नसला तरी या सिनेमातील गाणी, संवाद आणि साधेपणा प्रेक्षकांना नक्कीच आकर्षित करेल.
विक्रांत मैसी एक उत्कृष्ट अभिनेता आहे हे त्याने '12th फेल' या सिनेमात दाखवून दिलं आहे. मनोजच्या भूमिकेल्या त्याने पूर्णपणे न्याय दिला आहे. त्यामुळे या सिनेमातील त्याच्या कामाचं कौतुक व्हायलाच हवं. मेधा शंकरने विक्रांच्या मैत्रीनीचं पात्र योग्यपद्धतीने साकारलं आहे. दोघांचा सटल अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.
विधु विनोद चोप्रा यांनी '12th फेल' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. विनोद चोप्रा यांच्या सर्वोत्कृष्ट सिनेमांच्या यादीत नक्कीच या सिनेमाची गणना होईल. शांतनु मोइत्राचं संगीत उत्तम आहे. एकंदरीतच '12th फेल' हा भावनिक सिनेमा आहे. एक प्रेरणादायी प्रवास नक्कीच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. त्यामुळे सिनेमागृहात जाऊन हा सिनेमा नक्की पाहा.