International Film Festival Of India: 54 व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियाला (International Film Festival Of India) म्हणजेच इफ्फीला (IFFI) लवकरच सुरुवात होणार आहे. यंदा या फिल्म फेस्टिव्हलमध्ये 25 फीचर फिल्म्स आणि 20 नॉन-फीचर फिल्म्स दाखवल्या जाणार आहेत. 54 व्या इफ्फीमध्ये कोणत-कोणते चित्रपट दाखवण्यात येणार आहेत? याबाबत जाणून घेऊयात
54 वा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल हा गोव्यात 20-28 नोव्हेंबर 2023 दरम्यान होणार आहे. या फिल्म फेस्टिव्हलमध्ये 25 फीचर फिल्म्स आणि 20 नॉन-फीचर फिल्म्स दाखवल्या जाणार आहेत.
फीचर फिल्म्स-
आरारीरारो, आट्टम , अर्धांगिनी , डीप फ्रिज , धाई आखर , इरट्टा , काढाल एनबाथू पोथू उदमाई , कथल ,कांतारा, मलिकाप्पुरम , मंडली , मीरबीन , नीला नीरा सूरियान, नना थान केस कोडू , पुक्कलम , रवींद्र काब्य रहस्य , सना , द वॅक्सिन वॉर, वध,विदुथलाई पार्ट 1
Mainstream Cinema Section-
2018 , गुलमोहर , पोन्नियिन सेल्वन-2 , सिर्फ एक बंदा कॉफी है, द केरळ स्टोरी
नॉन-फीचर फिल्म्स-
1947: ब्रेक्झिट इंडिया, अँड्रो ड्रीम्स , बासन , बॅक टू द फ्यूचर, बरुआर क्सॉन्गक्सर, बेहरूपिया - द इम्पर्सोनेटर , भंगार, नानसेई निलम, छुपी रोह,गिद्ध, कथाबोर , लचित , लास्ट मीट , लाइफ इन लूम , माऊ: द स्पिरिट ड्रीम्स ऑफ चेराव, प्रदक्षिणा , सदाबहार , श्री रुद्रम, द सी अँड सेव्हन व्हिलेज आणि उत्सवमूर्ती
मराठी चित्रपट
यंदा इफ्फी या चित्रपट महोत्सवात उत्सवमूर्ती, प्रदक्षिणा आणि भंगार हे मराठी चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. यामधील उत्सवमूर्ती या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिजीत अरविंद दळवी यांनी केले आहे. तर प्रदक्षिणा या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रथमेश महाले यांनी केले आहे. भंगार या चित्रपटाचे दिग्दर्शन सुमिरा रॉय यांनी केले आहे.
इफ्फी-2023 मध्ये 'अँड्रो ड्रीम्स' इफ्फी या चित्रपट महोत्सवाची ओपनिंग नॉन-फिचर फिल्म असेल. तर अट्टम, ही मल्याळम ओपनिंग फीचर फिल्म असेल. इफ्फीमध्ये दाखवल्या जाणाऱ्या चित्रपटांची निवड ही भारतातील चित्रपटसृष्टीतील प्रतिष्ठित व्यक्तींद्वारे केली जाते ज्यात फीचर फिल्मसाठी एकूण बारा ज्युरी सदस्य आणि संबंधित अध्यक्षांच्या नेतृत्वाखालील नॉन फीचर फिल्मसाठी सहा ज्युरी सदस्य असतात.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: