12th Fail Teaser Release: विधू विनोद चोप्रा (Vidhu Vinod Chopra) आणि झी स्टुडिओजने यांच्या 12 वी फेल (12th Fail) या आगामी चित्रपटाचा टीझर रिलीज केला आहे. हा टीझर गदर 2 (Gadar 2) चित्रपटासोबत चित्रपटगृहांमध्ये दाखवण्यात येणार आहे. हा चित्रपट अनुराग पाठक यांच्या याच नावाच्या सर्वाधिक विकल्या गेलेल्या कादंबरीवर आधारित आहे.


12 वी फेल (12th Fail Teaser) हा चित्रपट UPSC ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थांवर आधारित आहे. UPSC विद्यार्थ्यांचे जीवन,त्यांची जिद्द, कठोर परिश्रम आणि त्यांच्यातील घनिष्ठ मैत्री दर्शवतो. 12 वी फेल हा चित्रपट त्या सर्वांसाठी आहे जे अपयशाला RESTART करण्याची संधी म्हणून पाहतात. यामध्ये शंतनू मोईत्रा यांनी रीस्टार्ट नावाचे गाणे आहे. 


पाहा टीझर:






चित्रपटाच्या टीझरबद्दल दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा (Vidhu Vinod Chopra) सांगतात, "हा चित्रपट म्हणजे आपल्या देशाच्या संविधानाचे रक्षण करणाऱ्या प्रामाणिक अधिकाऱ्यांना आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन यूपीएससीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. जर या चित्रपटाने काही लोकांना प्रामाणिकपणा आणि उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करण्यास प्रवृत्त केले तर मी ते यश मानेन."


शारिक पटेल, मुख्य व्यवसाय अधिकारी, झी स्टुडिओज म्हणाले की, "12वी नापास हा चित्रपट विद्यार्थ्यांसमोर असणारी आव्हाने आणि दीर्घकाळ टिकणारी मैत्री दर्शवतो. विधू विनोद चोप्रा दिग्दर्शित हा चित्रपट तरुण पिढीच्या भावना आणि अडचणींवर मात करून जिंकण्याचा त्यांचा प्रवास दाखवतो.


12वी नापास (12th Fail Teaser) हा चित्रपट दिल्लीमध्ये शूट करण्यात आला आहे. यूपीएससीच्या तयारीचे केंद्र मानल्या जाणाऱ्या मुखर्जी नगरमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले आहे. येथे हजारो विद्यार्थी राहतात आणि नागरी परीक्षांची तयारी करतात. येथील विद्यार्थ्यांसोबत 12वी नापास  या चित्रपटाचे शूटिंग झाले असून हा चित्रपट त्यांच्या खऱ्या घटनांवर आधारित आहे.


कधी रिलीज होणार चित्रपट?


विधू विनोद चोप्रा यांचा 12वा फेल (12th Fail) हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगू आणि मल्याळममध्ये 27 ऑक्टोबर रोजी जगभरात रिलीज होणार आहे.


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या :


Gadar 2 : ओपनिंग दिवशी 'गदर 2' करणार मोठी कमाई! पहिल्याच दिवशी तोडणार 'पठाण'चे रेकॉर्ड?