Maharani Season 3 Review: ज्यांना राजकारणात रस आहे त्यांना बिहारच्या राजकारणाविषयी माहिती असेलच. राजकारणाबद्दल बोलायचे झाले तर राजकारण आणि घाणेरडे राजकारण दाखवणारे आजवर अनेक वेबसिरिज आणि चित्रपट आले आहेत. हुमा कुरेशी अशीच एक वेबसिरिज SonyLIVवर प्रदर्शित करण्यात आला आहेत. महाराणी या सिरिजचा तिसरा सिजन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.इथे हुमाच्या अभिनयाची जादू पाहिली जी आजपर्यंत आपण पाहिली नव्हती आणि बिहारच्या राजकारणाचा चेहराही बघितला ज्याबद्दल बिहारच्या लोकांना चांगलं माहित आहे. आता महाराणीचा सीझन 3 देखील रिलीज झाला आहे, पण त्याची कथा काय आहे, चला जाणून घेऊया.
काय आहे कथा?
महाराणी सीझन 3' या वेब सीरिजची कथा तिथून सुरू होते जिथे मागील सीझनची कथा संपली होती. राणी भारती तीन वर्षांपासून तुरुंगात आहे. राणी भारतीचे राजकीय सल्लागार मिश्राजी वारंवार राणी भारतीला जामिनावर तुरुंगातून बाहेर येण्याचा सल्ला देतात, परंतु राणी भारती प्रत्येक वेळी नकार देतात. अशा परिस्थितीत काहीतरी घडते ज्यामुळे राणीला बाहेर यावे लागते.
आणि बाहेर येताच नवीन कुमार आणि राणी यांच्यात फेस ऑफ सुरू होतो. राणी भारतीच्या विरोधकांना वाटतं की ती तुरुंगात असतानाच तिचा अभ्यास पूर्ण करत होती, पण याच नावाखाली ती तुरुंगात सैन्य तयार करते आणि तुरुंगातून बाहेर आल्यानंतर ती तिच्या पतीच्या हत्येच्या आरोपातून स्वतःला निर्दोष ठरवते, इतकेच नव्हे तर ती तिच्या विरोधकांना देखील सळो की पळो करुन सोडते. पण यावेळी राणी भारती मुख्यमंत्री होऊ शकेल का, या सगळ्यात तिची मुलं तिला साथ देतील का आणि कोणते नवे चेहरे या राजकीय खेळाचा भाग बनतील, या सगळ्याची उत्तरं ही सिरिज देते.
कशी आहे सिरिज?
सुभाष कपूरच्या या सरिजच्या आधीच्या दोन सीजनने देखील धुमाकूळ घातला होता आणि त्याला प्रेक्षकांचे देखील प्रेम मिळाले होते.आता या सीझनबद्दल बोलायचे झाले तर याचे दिग्दर्शन सौरभ भावे यांनी केले असून पूर्वीप्रमाणेच यावेळीही कथेत अनेक ट्विस्ट आले आहेत. ज्यामुळे तुमची उत्सुकता कायम राहील. या सीझनमध्ये नवीन कुमारची भूमिका खूपच मजबूत दिसली, तर सोहम शाहचीही आठवण झाली. राजकारणाच्या दलदलीत अडकल्यावर आईसाठी किती अडचणी येतात, हे विशेषत: या सिजनमध्ये तुम्हाला चांगलेच दाखवून दिले आहे. या सिजनमध्ये एकूण आठ एपिसोड आहेत. पण हे देखील खरे आहे की, यावेळी कथेत सांगण्यासारखं फार काही नाही, मधल्या काही भागांचा वेग खूपच कमी वाटतो पण तरीही तुम्ही ते बघून थांबू शकणार नाही.
या मालिकेच्या कथेत राणी केवळ एक महिला मुख्यमंत्री म्हणूनच नाही तर राजकारणातील एक मोठी नेत्याच्या रुपात समोर आली आहे आणि बिहारमधून पंतप्रधानपदासाठी कोणी दावेदार असेल तर ती आहे, असे मानले जाते
अभिनय
पहिल्या आणि दुसऱ्या सीझनमध्ये आपल्या दमदार अभिनयाने लोकांच्या मनावर राज्य करणारी हुमा कुरेशी तिसऱ्या सीझनमध्येही अप्रतिम दिसत आहे. या सीझनमध्येही त्याने आपले पात्र निभावले. त्याची डायलॉग डिलिव्हरी प्रत्येक कोनातून जबरदस्त दिसते. नवीन कुमारच्या भूमिकेत अमित सियालनेही उत्तम काम केले आहे. कणी कुश्रुतीनेही उत्कृष्ट काम केले आहे. विनीत कुमार, अनुजा साठे आणि प्रमोद पाठक यांनीही चांगले काम केले आहे.
दिग्दर्शन
सौरभ भावे यांनी या सीझनचे दिग्दर्शन केले असून नवीन कुमार आणि राणी भारती यांची राजकीय रॅली आणि भाषण ज्या पद्धतीने चित्रित करण्यात आले ते पाहणे मजेशीर आहे. त्याच वेळी, राजकारणाबरोबरच, पात्रांच्या भावना चांगल्या प्रकारे दर्शविल्या गेल्या आहेत. दिग्दर्शनासोबतच कॅमेरावर्क देखील प्रत्येक वेळेप्रमाणे अप्रतिम दिसत होते आणि संगीतही दमदार होते. यावेळी जे काम झाले नाही ते म्हणजे त्याची गती मंद होती कारण कदाचित निर्मात्यांना या राजकीय नाटकात दाखवण्यासाठी फारसे नवीन नव्हते. आता त्याचा चौथा सीझन येणार का हा प्रश्न आहे आणि तो आला तर त्यात राणी भारतीसाठी नवीन काय असेल?
स्टार - 3.5