शिवसेनेची ५० वर्षांची वाटचाल
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपने महाराष्ट्रात मोदी लाटेमुळे ४८ पैकी तब्बल ४२ जागा जिंकून विक्रम केला. या निवडणुकीत शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App२३ जानेवारी २०१३ रोजी शिवसेना भवनात शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेनेचे उपनेते, खासदार, आमदार, पदाधिकारी असे सुमारे दोनशे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत शिवसेना कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांची शिवसेनेच्या पक्षप्रमुखपदी निवड करण्यात आली.
२००७ची मुंबई महापालिकेची निवडणूक शिवसेनेसाठी अस्तित्वाची लढाई होती. कारण, एकतर शिवसेनेतून बाहेर पडलेल्या राज ठाकरे यांच्य़ा मनसेने चांगलेस बाळसे धरण्यास सुरुवात केली होती. शिवसेना महापालिकेवरची सत्ता टिकवणार का असा प्रश्न उपस्थित केला जात होता. त्यावेळी मुंबईकरांनी शिवसेना-भाजपाच्या पदरात १११ जागा टाकून मुंबईवरचा भगवा कायम ठेवला. शिवसेनेला ८३ तर भाजपाला २८ जागा मिळाल्या.
19 जून 1966 रोजी सहदेव नाईक यांनी नारळ फोडून शिवसेनेच्या पहिल्या शाखेचे उद्घाटन केले. तर प्रबोधनकारांच्या हस्ते शिवसेनेच्या सभासद नोंदणीचे तक्ते देण्यास सुरुवात झाली. (फोटो सौजन्य : शिवसेना संकेतस्थळ)
6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्येत संघ परिवाराने सुरु केलेल्या कार सेवच्या माध्यमातून जमलेल्या लाखो कार सेवकांनी बाबरी जमीनदोस्त केली. पण त्याची जबाबदारी घ्यायला संघ परिवार तयार नव्हता. तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनीच ती जबाबदारी स्वीकारली आणि शिवसैनिकांनीच बाबरी मशीद पाडल्याचं जाहीर केलं
१७ नोव्हेंबर, २०१२ रोजी दुपारी ३ वाजून ३३ मिनिटांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले. १८ नोव्हेंबर, २०१२ बाळासाहेबांच्या अंत्ययात्रेला अलोट गर्दी लोटली होती. हजारो शिवसैनिकांना अश्रू अनावर झाले होते.
२०१५ ची विधानसभा निवडणुकीत जागांच्या वाटाघाटीवरून शिवसेना-भाजपची अभेद्य युती तुटली. ही निवडणूक शिवसेनेला एकट्याने लढावी लागली. या निवडणुकीत शिवसेनेचे ६४ आमदार निवडून आले.
1987 च्या विधानसभेची विलेपार्लेच्या पोटनिवडणूक शिवसेनेने हिंदूत्वच्या मुद्द्यावर लढली. त्यावेळी राज्यात शरद पवारांचे पुलोदचे सरकार अस्तित्वाच होते. शिवसेनेने या निवडणुकीत डॉ. रमेश प्रभू यांना उतरवले होते.(फोटो सौजन्य : शिवसेना संकेतस्थळ)
मुंबई महानगरपालिकेच्या 1968 साली झालेली निवडणूक शिवसेनेने प्रजा समाजवादी पक्ष या राष्ट्रीय पक्षाबरोबर युती करून लढवली. या युतीसाठी प्रा. मधू दंडवते यांनी पुढाकार घेतला होता. शिवसेना-प्रजा समाजवादी पक्षाच्या युतीला मुंबईकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. शिवसेनेने या निवडणुकीत 42 जागांवर विजय मिळवला, तर युतीतील भागीदार प्रजा समाजवादी पक्षाला 11 जागा मिळाल्या.
१९९७चा काळ शिवसेना-भाजप युतीचा सुवर्ण काळच होता. राज्यातील ९ महानगरपालिका आणि सर्व जिल्हा परिषदा यांच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. या सर्व निवडणूका शिवसेना-भाजपा युती म्हणूनच लढविणार असल्याचा निर्णय शिवसेनाप्रमुख आणि प्रमोद महाजन यांनी एका संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर केला. निवडणुकांचे निकाल जाहीर झाले त्यावेळी मुंबई महापालिकेतील १६९ जागांपैकी शिवसेना-भाजपा युतीला १०८ जागा मिळाल्या. तर ठाणे, उल्हासनगर महानगरपालिकेत शिवसेना-भाजपा क्रमांक एकचा पक्ष ठरला. तर जिल्हा परिषदेच्या निवडणुकांतही १० जिल्हा परिषदा शिवसेना-भाजपाला मिळाल्या. (फोटो सौजन्य : शिवसेना संकेतस्थळ)
30 ऑक्टोबर 1966 या दिवशी शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा दादरमधील शिवाजी पार्कवर संपन्न झाला. या मेळाव्याला बाळासाहेबांचे बंधू श्रीकांत ठाकरे, रामराव आदीक, प्रा. स.अ. रानडे, अॅड. बळवंत मंत्री आणि बाळासाहेबांचे वडील प्रबोधनकार ठाकरे उपस्थित होते. (फोटो सौजन्य : शिवसेना संकेतस्थळ)
२००२ मध्ये झालेल्या मुंबई, ठाणे आणि नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा युतीने भगवा फडकवला.
१९९५च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने शिवसेनेने सोबत युती केली. या निवडणुकीत शिवसेना-भाजपा युतीला १३४ जागांवर विजय मिळाला. काँग्रेसला केवळ ८४ जागी यश मिळाले. शिवसेनेचे मनोहर जोशी यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर भाजपच्या गोपीनाथ मुंडे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
1967 च्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेने ठाणे महानगरपालिकेवर पहिल्यांदा आपला भगवा फडकवला. या निवडणुकीत शिवसेनेने 40 पैकी 17 जागांवर विजय मिळवला होता. (फोटो सौजन्य : शिवसेना संकेतस्थळ)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -