पावसाळ्यात पर्यटकांना आकर्षित करणारे महाराष्ट्रातील 10 ठिकाणं
पावसाळा म्हटलं की आपसूकच फिरावसं वाटतं आणि पाऊलं घराबाहेर पडतात. मात्र फिरण्यासाठी मोठा प्रश्न असतो तो, ठिकाण शोधण्याचा. पण महाराष्ट्रात असे काही ठिकाणं आहेत, ज्यांना नैसर्गिक सौंदर्याचं वरदान लाभलं आहे. पाहूयात महाराष्ट्रातील मनाला प्रसन्न करणारी निसर्गरम्य ठिकाणं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपावसाळ्यात माथेरानमध्ये ट्रेकिंग करण्याचा आणि वन सौंदर्य पाहण्याचा आनंद घेता येतो. ( सर्व फोटो सौजन्यः महाराष्ट्र राज्य पर्यटन विभाग maharashtratourism.gov.in)
माथेरानः पर्यावरणमुक्त हिल स्टेशन अशी ओळख असलेल्या माथेरानमध्ये पर्यटक सुट्टीचा खरा आनंद घेऊ शकतात. मुंबईपासून 110 किलोमीटर अंतरावर असलेलं हे हिल स्टेशन समुद्रसपाटीपासून 803 मीटर अंतरावर आहे.
माळशेज घाटातील एक दृष्य
माळशेजः माळशेज घाट हे पावसाळ्यात फुलणारं नंदनवन आहे. पावसाळ्यामध्ये माळशेज घाटातील दृष्य डोळ्यात सामावून घ्यावं तेवढं कमी पडतं. हा घाट अहमदनगर ते कल्याण दरम्यानचा सर्वात मोठा घाट आहे. माळशेज घाटातील धबधबे, फुललेल्या डोंगररांगा यांचं दुर्मिळ दृष्य पाहण्याची संधी पर्यटकांना पावसाळ्यात असते.
कोल्हापूरः राधानगरी म्हणून ओळखली जाणारी कोल्हापूर नगरी ही पर्यटनासाठी सुंदर ठिकाण आहे. कोल्हापूर शहरातील महालक्ष्मी मंदीर आणि शहरापासून जवळच असलेला पन्हाळा किल्ला, विविध वन्यजीव अभयारण्य हे पर्यटनाचे केंद्र आहेत. सोबतच कोल्हापूरचे विविध खाद्य पदार्थ देखील प्रसिद्ध आहेत.
लोणावळाः मुंबई किंवा पुण्यात राहणाऱ्यांसाठी लोणावळा आणि खंडाळा हे ठिकाण सोयीचं पर्यटनस्थळ आहे. लोणावळ्यात रे वूड पार्क, वाळवण डॅम, टायगर्स पॉईंट असे अनेक प्रसिद्ध ठिकाणं आहेत. पावसाळ्यात पर्यटकांसाठी टायगर धबधबा हे प्रसिद्ध ठिकाण आहे.
महाबळेश्वर, पाचगणीः सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर महाराष्ट्रातील प्रसिद्ध हवेचं ठिकाण म्हणून ओळखलं जातं. पावसाळ्यात या महाबळेश्वरची ट्रिप पर्यटकांसाठी पर्वणी ठरु शकते.
कोयना धरणावर विविध सिंचन, विद्युत प्रकल्प बांधलेले आहेत. पावसाळ्यात कोयना धरणाच्या सौंदर्यात भर घालणारे विविध पक्षी पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय असतात.
कोयना धरण ( महाबळेश्वर): पश्चिम घाटात बाराही महिने डोळ्याला दिपवणारं पाणी कोयना धरणात तुम्हाला पाहायला मिळेल. कोयना धरण पुणे शहरापासून 120 किलोमीटर अंतरावर आहे. कोयना महाराष्ट्रातील सर्वात मोठं धरण आहे.
चिखलदराः अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा हे हिल स्टेशन विदर्भातील नंदनवन म्हणून ओळखलं जातं. महाराष्ट्रातील प्रसिद्ध हवेच्या ठिकाणांपैकी चिखलदरा एक आहे. सोबतच येथे विविध वन्य प्राणी सुद्धा पाहायला मिळतात.
भिमाशंकर येथे महाराष्ट्राचा वन्य प्राणी शेकरु आणि खार यांसारखे दुर्मिळ वन्य जीव आढळतात.
भिमाशंकर (पुणे): देवस्थान, हिल स्टेशन आणि वन्य प्राणी यांची संपदा असलेलं भिमाशंकर हे नैसर्गिक पर्यटनस्थळ आहे. ट्रेकिंग प्रेमींसाठी देखील हे एक चांगलं ठिकाण आहे.
मराठवाड्यातील थंड हवेचं ठिकाण म्हणून ओळखलं जाणारं महेशमाळ देखील शहरापासून अवघं 25 किलोमीटर आहे. पावसाळ्यात या महेशमाळ आणि लेण्यांवरिल निसर्ग सौंदर्य पर्यटकांना भुरळ घालणारं असतं.
औरंगाबादः औरंगाबाद ही महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखली जाते. औरंगाबाद शहरात बीबी का मकबरा, पानचक्की असे प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहेत. याशिवाय जगप्रसिद्द वेरुळ आणि अजिंठा लेण्या आहेत. अजिंक्य असा देवगिरी किल्ला देखील औरंगाबाद शहरापासून हाकेच्या अंतरावर आहे.
अंबोली हे समुद्रसपाटीपासून 690 मीटर उंचीवर असणारं ठिकाण आहे. अंबोलीपासून जवळच इतरही प्रसिद्ध पर्यटनस्थळं आहेत.
अंबोलीः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे महाराष्ट्राची राणी म्हणून ओळखलं जाणारं हिल स्टेशन आहे. पावसाळ्यात या ठिकाणाची शोभा पाहण्यासारखी असते. येथील वातावरण थंड, शांत आणि प्रसन्न असतं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -