LIVE : राज्यभरातील गणपती विसर्जन मिरवणूक

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 01 Jan 1970 05:30 AM
मनमाड : मनमाडसह मालेगाव, येवलामध्ये मोठ्या उत्सहात गणेश विर्सजन मिरवणूका सुरु आहेत. संध्याकाळी उशिरा मोठ्या सार्वजनिक मंडळांच्या मिरवणुकींना सुरुवात झाली. मालेगावमध्ये कडक पोलिस बंदोबस्तात मिरवणुका सुरु असून ढोल-ताशे, डीजेच्या जल्लोषात कार्यकर्ते नाचत असल्याचं दृष्य पहायला मिळालं.

नागपूर : नागपुरात गणपती विसर्जन मोठ्या उत्साहात पार पडत आहे. शहरातील नऊ तलावांवर आणि महापालिकेने उभारलेल्या कृत्रिम तलावांवर गणपती विसर्जन केलं जात आहे. सकाळी नागपूरच्या राजाची मिरवणूक तुळशीबागेतून कोराडीच्या तलावाच्या दिशेने निघाली. दुपारनंतर शहरातील सार्वजनिक मंडळांनी विसर्जन मिरवणुकीला सुरुवात केली.

नागपुरात यावर्षी अकराशेपेक्षा जास्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेशमूर्तींची स्थापना केली होती. त्यापैकी सुमारे 700 गणपतींचं विसर्जन अनंतचतुर्दशीला पार पडत आहे. उर्वरित मंडळांचं विसर्जन पुढील दोन दिवसात होणार आहे.

फुटाळा तलावासह ज्या नऊ तलावांवर मोठ्या मंडळांना विसर्जनाची परवानगी देण्यात आली आहे, तिथे पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.
बीड : 'पुढच्या वर्षी लवकर या' या जयघोषयात बीडमधल्या मानाच्या गणपतीची भक्तिमय वातावरणात मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढल्याने मोठ्या प्रमाणात महिला सहभागी झाल्या होत्या. ढोलताशा लेझीम पथक आणि पारंपरिक नृत्य करुन बाप्पाला निरोप देण्यात आला. बीडमधल्या मुख्य रस्त्यावरुन गणरायाची मिरवणूक काढण्यात आली. भक्तांनी मोठ्या प्रमाणात बाप्पाच्या दर्शनासाठी गर्दी केली.

सांगली : डॉल्बीमुक्त गणेशोत्सवामुळे सांगलीत यंदाच्या विसर्जन मिरणवणुकीमध्ये अनेक पारंपरिक नृत्यं पाहायला मिळाली. कर्नाटकातील गोकात नृत्य मिरजमध्ये निघालेल्या गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत सादर करण्यात आलं. आकर्षक वेशभूषा करुन हे कर्नाटकी नृत्य सादर करण्यात आलं. छोटे ढोल आणि ताशाच्या सहाय्याने मिरवणुकीत हे नृत्य करण्यात आलं.

रत्नागिरी : कोकणात विसर्जन मिरवणुकांना काहीशी उशिराने सुरुवात होते. कोकणात जसं डोक्यावर धरुन गणपतीचं आगमन होतं, तसंच विसर्जनाच्या मिरवणुकीतही बाप्पाला डोक्यावर उचलून घेतलं जातं. संध्याकाळी कोकणच्या गावागावात निघालेल्या या विसर्जन मिरवणुकांत चाकरमान्यांसह कोकणी माणूस मोठ्या उत्साहाने सहभागी झाला.

ढोल ताशांच्या पारंपरिक वाद्यात या मिरवणुका निघाल्या आहेत. कोकणातील समुद्र आणि नदी किनारी हा विसर्जन सोहळा पार पडतो. एकट्या रत्नागिरीत आज 36 हजारहून अधिक गणेशमूर्तीचं विसर्जन होत आहे.

अहमदनगर : जिल्ह्यात भक्तीमय वातावरणात श्रींच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. जिल्ह्यातील चौदाही तालुक्यात पारंपारिक पद्धतीने ढोल ताशांच्या निनादात विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. नगर शहराचं ग्रामदैवत आणि मानाच्या माळीवाड्यातील विशाल गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात झाली. जिल्हाधिकारी अभय महाजन आणि देवस्थानचे अध्यक्ष अभय आगरकर यांच्या उपस्थितीत महापूजा संपन्न झाल्यावर मिरवणूक निघाली. कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जिल्ह्यात तीन हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला. त्याचबरोबर शहरात विसर्जन मार्गावर 55 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर होती.
नंदुरबार शहरात मिरवणुकांना 8 वाजल्यापासून सुरवात झाली. नंदुरबारच्या लयबद्ध मिरवणुकांसोबत गणेश उत्सवात गोफ नृत्य आकर्षणाचं खास केंद्रबिंदू असतो. गेल्या 51 वर्षांपासून हमालवाडा परिसरात मंडळांच्या युवक गणेश मिरवणुकीत हा गोफ नृत्य सादर करतात. एका गोफेला टांगलेले 16 फेटे हे युवक लयबद्ध नाच करत गुंफतात आणि पुन्हा हा गोफ नृत्यतून सोडला जातो.
जालना : राज्यातील गावा-गावाप्रमाणेच जालना शहर आणि जिल्ह्यातही आपल्या लाडक्या बाप्पाला भक्तांनी आज आनंदाने निरोप दिला. जालना शहरातील मोतीबाग तलावात गणपती विसर्जनासाठी प्रशासनाकडून व्यवस्था करण्यात आली होती. याच ठिकाणी शहरातील गणेशभक्तांनी बाप्पाचा निरोप घेतला.
बाप्पाला घेऊन येत सहकुटुंब आरती करून ‘पुढच्या वर्षी लवकर या’ म्हणत गणेशभक्तांनी बाप्पाला निरोप दिला. शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांनीही मंडळाच्या बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी शहरातील प्रमुख चौकातून वाजत गाजत मिरवणूक काढत बाप्पाला निरोप दिला. गणपती विसर्जना दरम्यान कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाने विसर्जनाच्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे गणपती विसर्जन शांततेत पार पडलं.

औरंगाबदेतील विसर्जन मिरवणुकीवर ड्रोन कॅमेराची जशी नजर आहे, तसे हे ड्रोन बाप्पावर फुलांचा आणि गुलाब जलाचा वर्षाव देखील करत आहेत. संस्थान गणपती जो मानाचा गणपती आहे, त्यावर पोलीसांच्या वतीने ड्रोनच्या साह्याने फुलांचा वर्षाव करण्यात आला.
नाशिक : मानाच्या गणपतींची मिरवणूक सुरू, पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते आरती करून विसर्जन मिरवणूक मार्गस्थ
नागपूरच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

सोलापूर : सोलापुरातही गणेश विसर्जनाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. सकाळच्या सत्रात घरगुती गणरायाचं विसर्जन केलं जातं. कारण दुपारनंतर सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या जंगी मिरवणुका निघत असतात. आपल्या लाडक्या बाप्पाला हातात घेऊन घराघरातले गणेश भक्त जयघोष करत गणरायाला निरोप देत आहेत. सोलापूरच्या सिद्धारामेश्वर तलावात आज सकाळपासून घरगुती गणेशाचं विसर्जन केलं जात आहे.
अहमदनगरकरांचं ग्रामदैवत आणि मानाचा माळीवाड्यातील विशाल गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात, जिल्हाधिकारी अभय महाजन यांच्या हस्ते गणपती उत्थापन पूजा संपन्न, जिल्हाधिकारी महाजन आणि देवस्थानचे अध्यक्ष अभय आगरकर यांच्या उपस्थितीत मिरवणूकीला सुरुवात, पारंपारिक पद्धतीने ढोल ताशाच्या निनादात विसर्जन मिरवणूक

कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात, तुकाराम माळी तालीम मंडळाच्या पहिला मानाचा गणपती आरती करून प्रारंभ, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, महापौर हसीना फरास, पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांच्या हस्ते आरती करून मुख्य मिरवणुकीला सुरुवात, डॉल्बीला फाटा देत पारंपारिक पद्धतीने मिरवणुका काढा- चंद्रकांत पाटील यांचं गणेश मंडळांना आवाहन
नाशिक : नाशिकमध्ये लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविकांसोबतच महापालिका देखील सज्ज झाली आहे. गोदाप्रदूषण टाळण्यासाठी पालिकेमार्फत शहरात सहा विभागांमध्ये एकूण 54 ठिकाणी गणेश मूर्ती संकलन व्यवस्था करण्यात आली आहे.
त्यामध्ये 26 नैसर्गिक विसर्जन ठिकाणे आणि 28 कृत्रिम तलाव आहेत. काल विसर्जन तयारीच्या संदर्भात आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी आढावा घेऊन या ठिकाणांची पाहणी केली होती. पर्यावरणपूरक विसर्जन होण्यासाठी शाडू मातीच्या मूर्ती घरच्या घरी विसर्जित करून त्या मातीचा वापर झाडे लावण्यासाठी करा, त्याचप्रमाणे नाशिक मनपाने मोफत उपलब्ध करून दिलेले अमोनियम बायकार्बोनेट ची पावडर घरी आणून पाण्यात टाकून त्यात प्लास्टर ऑफ पॅरिसचे मूर्तीचे विसर्जन करावं, असं आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आलं आहे. गेल्या वर्षी 2 लाख 71 हजार मूर्तींचं संकलन करण्यात आलं होतं. यावर्षी यामध्ये वाढ होईल अशी आशा महापालिकेकडून व्यक्त केली जात आहे. मूर्ती दान करण्यासाठी सकाळपासूनच भाविकांनी आज या संकलन केंद्रांमध्ये हजेरी लावली आहे.
कोल्हापुरात डॉल्बीवर कारवाई, काल कोल्हापुरातील डॉल्बी व्यावसायिक ईब्रान साहेबलाल पठाण यांच्या शाहू कॉलनीसमोरील भगवा चौकातील गोडाऊनवर छापा, तर संदीप शिंदे यांच्या कदमवाडी रोडवरील गोडाऊनवरही पोलिसांचा छापा, दोन्ही छाप्यांमध्ये 6 मशिन्स आणि 20 बॉक्सेस अशी डॉल्बीची सामग्री जप्त, दोन्ही गोडाऊन्स सील

कोल्हापूर : सकाळी 8.30 वाजता तुकाराम माळी तरुण मंडळ मानाच्या गणेश मुर्तीच्या मिरवणुकीला सुरूवात होईल. महसुल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पूजन
जळगाव - गणेश विसर्जन मिरवणूक, महाराणा प्रताप मंडळाकडून तलवारबाजी, दानपट्टा, यांसारखी थरारक प्रात्यक्षिकं सादर केली जाणार
धुळे - विसर्जनासाठी निघालेल्या गणरायाच्या पालखीवर मशिदीतुन पुष्पवृष्टी केली जाणार, मशिदीतून आरती आणून मुस्लीम गणरायाची आरती करतात, ब्रिटीश काळापासून सुरू असलेली ही परंपरा याही वर्षी अबाधित राहणार
औरंगाबाद – संस्थान गणपतीची मिरवणूक सकाळी 11 वाजता सुरू होईल. त्यानंतर इतर मिरवणुका सुरू होणार
राज्यभरात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीची तयारी सुरु, औरंगाबादमध्ये विसर्जन मिरवणुकीवर ड्रोनची नजर, पोलिसांचा मोठा बंदोबस्त

पार्श्वभूमी

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.