LIVE BLOG : भगत सिंह कोश्यारी महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल

Background
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर
1. राष्ट्रवादीचे नेते पद्मसिंह पाटलांच्या पक्षांतरावरील प्रश्नावर शरद पवार संतापले, राजकारणात नातेवाईकांचा काय संबंध, पवारांचा पत्रकारांना प्रतिसवाल
2. नारायण राणेंच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचं भवितव्य अधांतरित, विलिनीकरणाचा निर्णय शिवसेनेला विश्वासात घेऊनच, एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत मुख्यमंत्र्यांचे संकेत
3. इन्कम टॅक्स रिटर्न्स भरण्याची आज शेवटची तारीख, सोशल मीडियावरील वाढीव तारखेचा दावा केवळ अफवा, आयकर विभागाची माहिती
4. जीडीपी 5 टक्क्यांवर आल्याने देशाच्या अर्थव्यवस्थेला जबरदस्त धक्का, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत विकास दरात मोठी घसरण, 10 सरकारी बँकांचं विलिनीकरण होणार
5. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना पाकिस्तानी मंत्र्याला विजेचा शॉक, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हाय़रल, नेटकऱ्यांचे तुफान कमेंट्स
6. नाशिकमध्ये बाप्पाच्या आगमनात खड्ड्यांचं विघ्न, शहरातील बहुतांश रस्त्यांची चाळण, 16 हजार खड्डे बुजवल्याचा प्रशासनाचा दावा























