एक्स्प्लोर
LIVE BLOG : आज दिवसभरात | 8 ऑक्टोबर 2019
Background
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
1. दसऱ्यानिमित्त देशभर उत्साह, देवीची मंदिर सजली, शिर्डीतील साई मंदिरात भाविकांची गर्दी, दादरचं फूल मार्केटही सजलं.
- नागपुरात थोड्याच वेळात संघाचा विजया दशमी सोहळा, सरसंघचालक मोहन भागवत भाषण करणार तर धम्म चक्र प्रर्वतन दिनानिमित्त नागपुरातील दीक्षा भूमीवर कार्यक्रम,
- महायुतीत लहान भाऊ झाल्यानंतर शिवसेनेच्या दसरा मेळाव्याकडे लक्ष, तर सावरगावमध्ये पंकजा मुंडेंच्या मेळाव्यात अमित शाहांची तोफ धडाडणार
- खडसे, रावल, गोरे, पाचपुते यांच्यासमोर बंडखोरांचं आव्हान कायम, सिंधुदुर्गात तिन्ही मतदारसंघात युती खुंटीला, अशोक चव्हाण, प्रणिती शिंदेंना दिलासा
- स्विस बँकेतल्या खातेदारांची पहिली यादी भारत सरकारच्या हाती, 75 देशातल्या 31 लाख खातेदारांचं गुपित स्वित्झर्लंडकडून उघड
- वायूदलाचा आज 87 वा स्थापना दिवस, आज पहिलं राफेल विमान भारताला मिळणार, फ्रान्समध्ये राजनाथसिंहांच्या हस्ते शस्त्रपूजन
12:01 PM (IST) • 08 Oct 2019
सांगली जिल्ह्यात भाजपचं तिहेरी बंड : - भाजप आणि शिवसेनेला सांगली जिल्ह्यातील बंडखोरी रोखण्यात अपयश आले असून सांगली, शिराळा, जत, आणि इस्लामपूर विधानसभा मतदार संघात बंडखोरी झाली आहे. बंडखोरीने भाजप उमेदवारांची चिंता वाढवली आहे. इस्लामपूर मतदार संघात राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या विरोधात शिवसेनेकडून गौरव नायकवडी मैदानात आहेत. मात्र तेथे भाजपचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी बंडखोरी केली आहे. राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याशी संघर्षातून त्यांनी बंड केले असून त्याचा शिवसेनेला त्रास होणार हे नक्की आहे. त्यामुळे इस्लामपूर मध्ये तिहेरी लढत होणार आहे.
Load More
Tags :
Maharashtra Abp Majha Latest Marathi News Trending News Marathi News Today News In Marathi Aaj Divasbharatमराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update























