LIVE BLOG | भारत वि बांगलादेश पहिला टी-20 सामना, बांगलादेशची भारतावर 7 विकेट्सने मात
LIVE

Background
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
१. सहकाऱ्यांची साथ नसल्यानं देवेंद्र फडणवीस एकाकी, संजय राऊतांचं विधान, तर सर्वजण साथीला असल्याचा गिरीश महाजनांचा दावा
२. सरकार स्थापन करण्यास भाजप अपयशी ठरल्यास सेना सत्तास्थापनेसाठी पाऊल उचलेल, माझा कट्ट्यावर राऊतांचं मोठं विधान, परतीचे दोर कापल्याचं म्हणत भाजपला इशारा
३. राज ठाकरेंनी घेतली शरद पवारांची भेट, बंद दाराआड झालेल्या चर्चेचा तपशील गुलदस्त्यात, तर आज दिल्लीत होणाऱ्या पवार आणि सोनियांच्या भेटीकडेही लक्ष
४. 10 हजार कोटी नव्हे तर 25 हजार कोटींची नुकसान भरपाई द्या, सरकारनं जाहीर केलेली मदत तोडकी असल्याचा विरोधकांचा आरोप, आज उद्धव आणि फडणवीस पाहणी दौऱ्यावर
५. दिल्लीच्या तीस हजारी कोर्टाबाहेर पोलीस आणि वकीलांमध्ये धुमश्चक्री, पार्किंगच्या वादातून कोर्ट परिसरातच पोलीसांचा गोळीबार, संतापलेल्या वकिलांकडून तोडफोड
६. नाशिकमध्ये कोथिंबिरच्या जुडीला 280 रुपयांचा भाव, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 100 जुड्यांना तब्बल 28 हजारांचा दर, अवकाळीमुळे दर गगनाला

महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
