LIVE BLOG : हाफिज सईदच्या 'जमात-उद-दावा' दहशतवादी संघटनेवर पाकिस्तानकडून बंदी
LIVE
Background
1. शेतकऱ्यांच्या मोर्चावर तोडगा निघाल्याचा गिरीश महाजनांचा दावा, तर लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय आंदोलन मागे नाही, आमदार जेपी गावितांचा पवित्रा
2. राज्यात आजपासून बारावीची परीक्षा, जवळपास पंधरा लाख विद्यार्थ्यांचं भवितव्य ठरणार, अर्धा तास आधी हजेरी लावणं बंधनकारक
3. रश्मी वहिनींच्या हातची साबुदाणा खिचडी आणि वड्यामुळे युतीची दिलजमाई, मुख्यमंत्र्यांचं खुमासदार उत्तर, लोकमत पुरस्कार सोहळ्यात दिलखुलास मुलाखत
4. पुलवामा हल्ल्यानंतर लगेच प्रचार सभा घेणं सुचू कसं शकतं? नांदेडमधील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सभेत शरद पवारांचा मोदींना सवाल, सभेत पुलवामातील शहीदांनाही श्रद्धांजली
5. धनगर आरक्षणासाठी उद्धव ठाकरे आज रात्री मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, त्याआधी शिवसेनेतील सर्व धनगर पदाधिकाऱ्यांना मातोश्रीवर बोलावणं
6. अयोध्या प्रकरणी 26 फेब्रुवारीला सुप्रीम कोर्टात सुनावणी, पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर प्रकरणाची सुनावणी