LIVE BLOG : प्रियांका गांधींच्या टीममध्ये आता दोन मराठी चेहरे
LIVE
Background
1. भारताकडे पुरावे मागणाऱ्या इम्रान खानच्या मंत्र्यांचे अतिरेक्यांशी संबंध, एबीपी माझाच्या हाती लागलेल्या व्हिडीओत इम्रानचे मंत्री हाफिजच्या दहशतवाद्यांसोबत
2. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्क्यांची वाढ, महागाई भत्ता 9 टक्क्यावरुन 12 टक्के होणार, अर्थमंत्री अरुण जेटलींची माहिती
3. युतीच्या तहात जिंकलो आता युद्धात जिंकायचं, उद्धव ठाकरेंची कार्यकर्त्यांना चेतना, शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवणार असल्याचा पुनरुच्चार
4. खासदार किरीट सोमय्यांविरोधात शिवसैनिकांचा दबाव वाढला, शिशिर शिंदेंसह शिवसैनिक मातोश्रीवर, ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघावरुन घमासान
5. लोकसभा निवडणूक शरद पवार लढवणार, पहिल्यांदाच माध्यमांसमोर पवारांचं वक्तव्य, तर पवारांची तिसरी पिढी लोकसभेच्या रिंगणात उतरणार नसल्याचं स्पष्टीकरण
6. विदर्भ, मराठवाड्याच्या काही जिल्ह्यात आज आणि उद्या पावसाची शक्यता, तर शेतकऱ्यांनी शेतमाल सुरक्षित ठेवावा, कृषी विभागाचं शेतकऱ्यांना आवाहन