LIVE BLOG : राणे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, तब्बल 40 मिनिटं चर्चा

Background
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
1. शिवसेना-भाजप युतीचं घोडं अखेर गंगेत न्हालं, लोकसभेला शिवसेना 23 तर भाजप 25 जागा लढवणार, तर विधानसभेसाठी मित्रपक्षांना जागा देत 50-50 चा फॉर्म्युला
2. युतीसाठी भाजपने पालघरच्या जागेवर पाणी सोडलं, तर व्यापक शेतकरी कर्जमाफी, नाणारची जागा बदलण्याची शिवसेनेची मागणी मान्य
3. स्थानिक स्वराज्य संस्थेतील शिवसेना-भाजपसोबतच्या युती-आघाडी तोडा, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार, अशोक चव्हाणांचे जिल्हास्तरावर आदेश
4. तुळजाभवानीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, उस्मानाबादमधील भीषण अपघातात सोलापूरच्या सात जणांचा मृत्यू
5. पैशांच्या व्यवहारासाठी एनीडेस्क अॅप धोकादायक, आरबीआयची बँक ग्राहकांना सूचना, तातडीने अॅप अनइन्स्टॉल करण्याचे निर्देश























