LIVE BLOG : नवीन मनोरा आमदार निवासाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन होणार
LIVE
Background
1. आरटीजीएस, एनईएफटीद्वारे पैसे ट्रान्सफर करण्यासाठी लागणारं शुल्क आजपासून रद्द, डिजिटल आर्थिक व्यवहारांना चालना देण्यासाठी रिझर्व्ह बँकेचा निर्णय
2. विधानसभेसाठी मनसेला सोबत घेण्याचा अद्याप काँग्रेसचा विचार नाही, अशोक चव्हाणांची माहिती, वंचित आघाडीवरच्या टीकेवरुनही घुमजाव
3. मुंबई-कोकणाबरोबरच विदर्भालाही मुसळधार पावसाचा इशारा, पालघरमध्ये वाहून जाणाऱ्या कारमधले चौघे थोडक्यात वाचले, तर वलसाडमध्ये पूल वाहून गेला
4.तेलंगणामध्ये टीआरएस कार्यकर्त्यांतकडून महिला वनअधिकाऱ्याला बेदम माराहण, वृक्षरोपणासाठी आलेल्या पोलिसांवर काठ्यांनी हल्ला
5. दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरियाच्या सीमेवर डोनाल्ड ट्रम्प आणि किम जोंग यांची ऐतिहासिक भेट, दोन्ही देशांमधला तणाव निवळण्याची चिन्ह
6. इंग्लंडने टीम इंडियाची विजयी घोडदौड अखेर रोखली, इंग्लंडची भारतावर 31 धावांनी मात, इंग्लंडच्या उपांत्य फेरीच्या आशा अजूनही कायम