LIVE BLOG | सत्तेत आल्यास गरिबांना दरवर्षी 72 हजार रुपये देणारच : राहुल गांधी

Background
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
1. लोकसभा निवडणुकीआधाची पंतप्रधान मोदींची एक्स्क्लुझिव्ह मुलाखत, सकाळी 8 वाजता एबीपी माझावर प्रक्षेपण
2.चौकीदाराची चौकशी करुन तुरूंगात टाकणार, नागपुरातल्या सभेत राहुल गांधींचा पंतप्रधानांवर हल्लाबोल, आज चंद्रपूर आणि वर्ध्यात सभा
3.भाजपच्या विचारधारेशी असहमती म्हणजे देशविरोध नव्हे, ब्लॉगच्या माध्यमातून अडवाणींनी सोडलं मौन, भाजप नेत्यांना कानपिचक्या दिल्याची चर्चा
4. महाआघाडीत मनसेला नाकारणाऱ्या काँग्रेसकडूनच राज ठाकरेंच्या सभेचा आग्रह, माझाला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांचा गौप्यस्फोट, राज 8 सभा घेण्याची शक्यता
5. निवडणूक आयोगाला तुरूंगात टाकण्याची भाषा करणाऱ्या प्रकाश आंबेडकरांविरोधात गुन्हा दाखल, यवतमाळच्या सभेत केलेलं वादग्रस्त विधान भोवण्याची शक्यता
6. सनरायझर्स हैदराबादचा दिल्ली कॅपिटल्सवर पाच विकेटसनी विजय, जॉनी बेअरस्टोची 48 धावांची निर्णायक खेळी























