LIVE BLOG : उत्तर पश्चिम मुंबईमधून काँग्रेसकडून संजय निरुपम यांना उमेदवारी

Background
1. पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस, दिग्गज नेते पदयात्रा काढून उमेदवारी अर्ज भरणार
2. कोल्हापुरातल्या विराट सभेत प्रचाराचा नारळ फोडत मुख्यमंत्र्यांचं महाआघाडीवर शरसंधान, माढ्यातून माघार घेणाऱ्या शरद पवारांनाही टोला
3. 56 इंचं छातीवाले कुलभूषण जाधवांना का सोडवून आणत नाहीत, महाआघाडीच्या प्रचारसभेत शरद पवारांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा
4. वसंतदादा पाटलांचे नातू प्रतिक पाटलांची काँग्रेसला सोडचिठ्ठी, कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचं जाहीर, 'एबीपी माझा'च्या बातमीवर शिक्कामोर्बत
5. एकनाथ गायकवाडांकडे पैसे आहेत, त्यांनी कार्यकर्त्यांकडेही बघावं, काँग्रेसच्या सभेत संजय निरुपमांचं वादग्रस्त विधान
6. आयपीएलच्या बाराव्या मोसमात मुंबई इंडियन्सची निराशाजनक सुरुवात, दिल्ली कॅपिटल्सकडून पराभव, तर कोलकाताची हैदराबादवर मात























