LIVE BLOG : इंदापूरमध्ये भीमा नदीत पोहायला गेलेल्या दोन सख्ख्या बहिणींचा बुडून मृत्यू

Background
1. नरेंद्र मोदींच्या हस्ते 'पंतप्रधान किसान सन्मान निधी'चं आज उद्घाटन, एक कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपयांचा पहिला हप्ता जमा होणार
2. एअर इंडियाचं विमान हायजॅक करण्याच्या धमकीनंतर मुंबई विमानतळावर सुरक्षा वाढवली, पोलिसांकडून कसून चौकशी, एक संशयित ताब्यात
3. पुलवामा हल्ल्यावरुन असदुद्दीन ओवेसींचा पाकिस्तानवर हल्लाबोल, सत्ताधाऱ्यांसह विरोधकांवर जोरदार प्रहार, मुंबईत वंचित बहुजन आघाडीच्या सभेला तुफान गर्दी
4. राष्ट्रवादी काँग्रेसला संपवणं चिक्की खाण्याइतकं सोपं नाही, परळीत धनंजय मुंडेंचं पंकजा मुंडेंवर टीकास्त्र, तर छगन भुजबळांचं मुख्यमंत्री फडणवीसांना प्रत्युत्तर
5. औरंगाबादच्या आरोग्य मेळाव्यात चंद्रकांत खैरेंची अंधश्रद्धा, जप करुन मी रुग्णांना बरं करतो, मात्र प्रमोद महाजनांच्याबाबतीत मी फेल झालो, खैरेंचा अजब दावा
6. पाकिस्तानविरुद्धच्या विश्वचषक सामन्याविषयी केंद्र सरकारच्या निर्णयाशी बांधील राहू, टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीची प्रतिक्रिया























