LIVE BLOG : राज्यातील पूरस्थितीमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रशिया दौरा रद्द

Background
1. पुन्हा एकदा सोनिया गांधींच्या हाती काँग्रेसची कमान, हंगामी अध्यक्ष म्हणून कार्यकारिणीच्या बैठकीत निवड
2. पूर ओसरण्यासाठी आणखी 3 दिवस लागणार, मुख्यमंत्र्यांची माहिती, पूरग्रस्तांच्या धान्याच्या पाकिटावर नेत्यांची चमकोगिरी, टीकेनंतर दिलगिरी
3. राज्याच्या कानाकोपऱ्यातून पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ, कलाकार मंडळीही पुढे सरसावली, शिर्डी, सिद्धिविनायक संस्थानाचीही मोठी मदत
4. महापुरामुळे एसटी महामंडळाचं 100 कोटींचं नुकसान, मराठवाडा वगळता इतरत्र एसटी वाहतूक बंदच, अनेक आगार, बसस्थानक आणि बसेसचं मोठं नुकसान.
5. ईदला भारतात मोठा घातपात करण्याचा पाकिस्तानचा मनसुबा, मुंबई, दिल्लीसह महत्त्वाच्या शहरांमध्ये गुप्तचर यंत्रणांचा हायअलर्ट
6. विविध तांत्रिक कामांसाठी आज मुंबईतल्या तिन्ही रेल्वे मार्गांवर आज मेगाब्लॉक, वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडण्याचं आवाहन























