LIVE BLOG : मुंबई : अंधेरीतील असल्फा मेट्रो स्टेशनजवळील घराचा भाग कोसळला, 3 जण अडकल्याची भीती
LIVE
Background
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर
1. चंद्रापासून विक्रम लँडर 2.1 किमीवर असताना संपर्क तुटला, लँडरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न, इस्रोची माहिती
2. बंगळुरुत इस्रो सेंटरवर पंतप्रधान मोदींनी उंचावलं शास्त्रज्ञांचं मनोधैर्य, देशाला तुमचा अभिमान, संपूर्ण देश वैज्ञानिकांच्या पाठिशी, पंतप्रधान मोदी देशाला संबोधणार
3. शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांना हात लावणार नाही, मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण, टुरिझमला चालना देण्यासाठी 25 एेतिहासिक स्थळं भाडेतत्वावर देणार
4. विधानसभेच्या तोंडावर वंचित आघाडीत फूट,अपेक्षित जागा मिळत नसल्यानं एमआयएमचा स्वबळाचा नारा, प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेकडे लक्ष
5. मुसळधार पावसामुळं नरेंद्र मोदींचा नागपूर दौरा रद्द, मेट्रोचं लोकार्पण रखडण्याची शक्यता, मात्र मोदींचा मुंबई दौरा कायम
6. राधानगरी धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस, पंचगंगेची पाणीपातळी वाढली, कोल्हापुरात एनडीआरएफ टीम तैनात