हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील सक्रिय राजकारणात
अंकिता पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आल्याने बावड्याच्या पाटील घराण्यातील तिसरी पिढी आता राजकारणात आली आहे. स्वर्गीय माजी खासदार शंकरराव पाटील यांच्यानंतर त्यांचे पुतणे हर्षवर्धन पाटील राजकारणात आले. आता हर्षवर्धन पाटलांची कन्या अंकिता पाटील अशी तिसरी पिढी राजकारणात सक्रिय होत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appइंदापूर तालुक्याला शेजारी असणाऱ्या बारामती तालुक्याचे सर्वेसर्वा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही वर्षांपूर्वी आपली कन्या सुप्रिया सुळे यांना राजकारणात आणलं होतं. त्या सध्या तिसरी टर्म बारामतीच्या खासदार आहेत. हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील प्रथमच राजकीय क्षेत्रात पदार्पण करीत आहेत. त्यामुळे मुलीला राजकारणात आणून पवारांचा कित्ता पाटील गिरवणार असल्याची चर्चा इंदापूर तालुक्यासह महाराष्ट्रात आहे.
विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसनेही काँग्रेस उमेदवार अंकिता पाटील यांना पाठिंबा दिला आहे.
काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील सक्रिय राजकारणात प्रवेश करत आहेत.
बावडा-लाखेवाडी गटाच्या काँग्रेसच्या सदस्या आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मातोश्री रत्नप्रभादेवी पाटील यांच्या निधनामुळे रिक्त जागेसाठी 23 जूनला पोटनिवडणूक होत आहे. सर्वसमावेशक उमेदवार म्हणून अंकिता पाटील यांना उमेदवारी देण्याची मागणी दोन दिवसांपूर्वी शहाजीनगरमध्ये झालेल्या काँग्रेसच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी एकमताने केली होती.
इंदापूर तालुक्यातील बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद गटाच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवार म्हणून अंकिता पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
अंकिता पाटील आपला उमेदवारी अर्ज उद्या (गुरुवारी) सकाळी 10.30 वाजता दाखल करणार आहेत.
अंकिता पाटील यांचं शिक्षण परदेशात झालेलं आहे. त्या सध्या शहाजीराव पाटील विकास प्रतिष्ठानच्या उपाध्यक्ष तसंच इंडियन शुगर मिल्स असोसिएशन नवी दिल्लीच्या सदस्या आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -