सोलापूरचे फुफ्फुस 'कंबर तलावा'ला जलपर्णीचा वेढा
निविदा निघूनही कोणीच सुशोभीकरणाचे काम घ्यायला तयार नसून यावेळेसचा निधीही परत जाण्याची शक्यता असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमींनी केला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appस्मार्ट सिटी योजनेअंतर्गत संभाजी तलावाचे सुशोभीकरण करण्यात येणार असून आचारसंहितेमुळे प्रक्रिया थांबली होती. आता पुन्हा कामाला सुरुवात होईल, असं सांगण्यात आलं. मात्र आता आचारसंहिता संपली असली तरी प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही.
यंदाही शासनाने 17 कोटी रुपये मंजूर केले आहेत. मात्र अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
संभाजी तलावाच्या सुशोभीकरणासाठी शासनातर्फे गेल्या वेळेस आर्थिक तरतूद करुन निधी मंजूर करण्यात आला होता, मात्र निधी वापरला गेला नसल्याने परत गेला.
आजूबाजूच्या सोसायटीमधून सांडपाणी तलावामध्ये बिनधास्तपणे सोडलं जातं, मात्र शासनकर्त्यांचा कोणताच अंकुश यांच्यावर नाही.
गेल्या सहा-सात वर्षांपासून तलावाची अशीच अवस्था आहे. सामाजिक संस्था, नागरिक आणि प्रशासन यांच्या वतीने श्रमदान करुन जलपर्णी काढली मात्र दुसरा दिवस उजाडत नाही तोपर्यंत पुन्हा जलपर्णी पसरलेली असते. म्हणून यावर आता कायमचा तोडगा काढण्याची आवश्यकता आहे.
एकेकाळी कमळाच्या आकर्षक फुलांमुळे कमळ तलाव अशी ओळख असलेल्या या तलावाला गटाराचं स्वरुप आलं आहे.
वाढलेल्या जलपर्णीमुळे तलावाला अक्षरशः लॉनचं स्वरुप आलं आहे. परिसरात अत्यंत दुर्गंधी पसरली असून नागरिकांना त्रास होत आहे. मात्र प्रशासन फक्त आश्वासनाशिवाय दुसरं काहीच करत नाही.
सोलापूरचे फुफ्फुस अशी ओळख असलेल्या धर्मवीर संभाजी तलावाची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. 'कंबर तलाव' या नावानेही तो ओळखला जातो.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -