लातूरमध्ये अन्नकुटची लगबग
या सर्वपदार्थांसाठी संफरचंद ५० किलो, केळी २५ डझन, पपई १०० नग, डाळींब ४० किलो, खरबूज४० किलो, जांब १० किलो, संत्रा, मोसंबी आदी फळांचा वापर करण्यात आलाय. तसेच यासाठी ३० किलो काजू, किसमिस ३० किलो, बदाम ५ किलो, अंजीर ५ किलो वापरण्यात आले आहेत.
लातूर जिल्ह्यात अन्नकुट हा कार्यक्रम सार्वजनिकरित्या मोठ्या प्रमाणात साजरा होत असतो यासाठी गावातील तरुण मंडळी मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. तरुण मंडळी स्वत:च सर्व स्वयंपाक तयार करतात, अन् हे सर्व चवीचे मिश्रण करुन त्याच्या प्रसादाच्या रूपाने आनंदाने वाटप केले जाते.
२५० किलो गव्हाचे पीठ, ७० किलो बुंदी, किलो पकोडी ७०, रामचक्रा (मुगाचे वडे ) ४० किलो, मालपोवा ५० किलो आणि उडीद पापड ही सारी तयारी आहे लातुरमधील अन्नकूटची.
या कार्यक्रमासाठी प्रत्येकाला कामाचे वाटप झालेले असते. अगदी सामान खरेदीपासून ते आचारी आणि इतर बाबीवर देखरेख ठेवण्यापर्यंत सर्व कामे ही तरुण मंडळी मोठ्या उत्साहाने करतात.
लातूर शहरात अनेक ठिकाणी अन्नकूट कार्यकम केले जातात. ग्रामीण भागातील लोकांचा सहभाग नसतो. पण हे 23 तरुण धनेगाव येथील हनुमान मंदिरात हा कार्यक्रम घेतात. सर्व गावकऱ्यांना यासाठी बोलावले जाते. या 23 तृणाच्या घरचे नातेवाईक आणि मित्र परिवार ही यात सहभागी होत असतो.
श्रीकृष्ण गोवर्धन पर्वत उचलून लोकांचे संरक्षण केले. त्यानंतर प्रत्येकाने आपापल्या परिने काही पदार्थ आपल्या घरून आणून काला केला. त्यास अन्नकूट असे म्हणले जाते. ग्रामीण भागात हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यातून एकीचे बळ, सामाजिक सलोख्याचे विचार आणि थंडीच्या दिवसाची सुरुवात अश्या पदार्थाने केल्यास आरोग्यास उत्तम राहते, हा विचार यातून समोर येतो
अन्नकुटचे इतरही काही फोटो
काही नातेवाईक येऊ शकत नाहीत त्यांना पार्सल पाठवली जाते ते ही मुबई, हैदराबाद, पुणेसारख्या शहरात ही पाठवले जातात.
भाज्यांमध्ये गवारी, पालक, मेथी, हरभरा भाजी, वांगी, काकडी, तुरई, हिरवी मिरची, दुधी आणि काशी भोपळा, मुळा, करडी, मुळाची शेंगा, आणि या बरोबर येणाऱ्या सर्व २५० किलोंच्या भाज्या वापरण्यात आल्या आहेत.
अन्नकुटचे हे काम दोन टप्प्यात होते. पहिल्या टप्प्यात प्रथम पुरीचे काप, भाजी, पकोडी रामचक्रा याचे मिश्रण तयार करून बाजूला ठेवले जाते. उर्वरीत सामान त्यात बुंदी सुकेमेवे पापड एकत्र केले जाते. तर शेवटच्या टप्प्यात दोन्ही मिश्रण पुन्हा ठराविक प्रमाणात एकत्र केले जाते यातून अन्नकुट बनवले जाते.